लॉकडाउनमध्ये श्रमिकांच्या प्रवासाची सोय करणारा याने आता गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी खासगी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. करी रोड परिसरातील खापरादेव मंडळातर्फे या बस धावणार आहेत. ही मोफत बस सेवा केवळ करी रोड परिसरातील चाकरमान्यांसाठीच उपलब्ध राहणार आहे.
अवघ्या तीन आठवड्यांवर आलेल्या गणेशोत्सवकाळात गावी जाणाऱ्यांसाठी राज्य सरकारने अद्याप एसटी सुरू केलेली नाही. एसटी-रेल्वे बंद असल्याने खासगी बस चालक तिप्पट दराने तिकीटविक्री करीत आहेत. कोकणातील ग्रामपंचायतींनी १४ दिवसांच्या विलगीकरणाचा निर्णय घेतल्याने याची धास्ती देखील चाकरमान्यांमध्ये आहे. विलगीकरणाबाबतही सरकारने धोरण स्पष्ट केलेले नाही.
‘अभिनेता सोनू सूद याच्याशी आम्ही संपर्क साधला. त्याने मदत करण्याचे मान्य केले. त्यानुसार २८ ते ३० जुलैपर्यंत आरक्षण सुरू करण्यात आले. बुकिंगसाठी प्रवाशांकडून आधार कार्ड आणि वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात आले. गुरुवार सायंकाळपर्यंत १५० चाकरमान्यांनी बुकिंग केले. करी रोड ते कणकवलीपर्यंत ही बस धावणार आहे. ४ ते ६ ऑगस्ट या काळात या प्रवाशांना मोफत गावी पोहोचविण्यात येईल’, असे खापरादेव मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र तावडे यांनी सांगितले.
डीपी, स्टेटसवर सोनू
मंडळातील अनेकांनी डीपी, स्टेटसवर अभिनेता सोनू सूद असलेला फोटो ठेवल्याने हा ‘बॅनर’ व्हायरल झाला. मात्र केवळ करी रोड परिसरातील चाकरमान्यांसाठीच ही बस सेवा असेल, असे मंडळाचे सचिव तुषार लाड यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
I like the valuable information you provide in your articles.
A big thank you for your article.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.