नाशिक : शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. घरातील एकटेपणाचा फायदा घेत अल्पवयीन मुलाने आपल्या मामीकडे शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गंगापूर रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसाकडून याप्रकरणी माहिती मिळाली आहे. पीडित महिला एका‎ महाविद्यालयात शिक्षण घेते. तर पती दुसरीकडे राहतात. नणंदेने पीडित महिलेला घरी बोलावले होते. आम्ही बाहेर जातोय. तुम्ही‎ घरी येऊन मुलाला जेवण बनवून द्या व येथे रहा, असे‎ सांगितले होते. पीडित महिला घरी एकटी असताना अल्पवयीन मुलाने‎ महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत तिचा विनयभंग‎ केला. दोन वर्षांपासून लाईक करतो. तुम्ही मला खूप आवडता, आपण दोघे फिजिकल रिलेशनशीपमध्ये राहू, असे म्हणत मुलाने महिलेकडे गेटची चावी मागितली. त्यावेळी त्याने महिलेचा विनयभंग केला.

संशयित आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाने गेटची चावी मामीकडे मागत त्यांच्या शरीरास अंगलट झाला आणि यावेळी स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी महिलेने गंगापूर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी मुलास ताब्यत घेत बालन्यायालयासमोर हजर केले. या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत. संशयित आरोपी असलेला अल्पवयीन मुलगा आणि तक्रारदार महिला यांच्यामध्ये मनमोकळा संवाद व्हायचा. मात्र बोलण्या चालण्यातून त्या मुलामध्ये मामी विषयी आकर्षण वाढत गेले आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे त्याच्या मनात अशा पद्धतीच्या भावना जागृत झाल्याचे बोलले जातेय.
Nashik : हातातल्या त्या एका गोष्टीमुळे लागला खुनाचा छडा, आढळला होता शिर नसलेला मृतदेह
मुलगा घरी एकटाच असल्याने तो घाबरू नये म्हणून मामी त्यांच्याकडे मुक्कामी राहण्याकरिता आली. त्याने एकटेपणाचा फायदा घेत मामीकडे प्रेम भावना व्यक्त केली. आणि त्याने मामीचा विनयभंगही केला. यावेळी घाबरलेल्या मामीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेत थेट गंगापूर पोलीस ठाणे गाठले. आणि घडलेली आपबिती कथन केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत संशयित मुलास ताब्यात घेतले. विनयभंगाबाबत त्याची चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
भुताटकीच्या संशयातून दाम्पत्यासोबत घडलं भयंकर; जादूटोणा, तंत्र-मंत्रचा अघोरी खेळ…
मुलाचे वय १६ असून तो अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला बालन्यायालयासमोर हजर केले. या ठिकाणी मुलास अल्पवयात होणाऱ्या चुका आणि त्याचे होणारे दूरगामी परिणाम याबाबत माहिती देत समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर मुलास आई- वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. मुलाकडे लक्ष ठेवण्यासह त्याच्याशी सुसंवाद ठेवला जाईल. त्याला चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव करून दिली जाईल, असे सांगत कुटुंबीय मुलाला घेऊन घरी आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here