अदानी समूहाला बसला तिसरा मोठा धक्का
२४ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग रिसर्च अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाला हा तिसरा मोठा धक्का आहे. प्रथम, त्यांनी DB पॉवर खरेदी करण्याचा करार पूर्ण केला नाही आणि नंतर PTC India साठी बोली लावण्यापासून ते मागे हटले.
दोन्ही कंपन्यांनी महाराष्ट्रातील तिरोडा येथे सिमेंट ग्राइंडिंग युनिट स्थापन करण्यासाठी सप्टेंबर २०२१ मध्ये सामंजस्य करार केला होता. त्यासाठी ओरिएंट सिमेंटने ३५ एकर जमीनही पाहिली होती. परंतु ओरिएंट सिमेंटचे म्हणणे आहे की अदानी पॉवरला त्यांच्या प्लांटसाठी एमआयडीसीकडून आवश्यक मंजुरी मिळू शकली नाही. तसेच या सामंजस्य कराराची कालमर्यादाही निघून गेली आहे.
बुधवारी अदानी पॉवरचा समभाग पाच टक्क्यांनी घसरून १६२.४५ रुपयांवर बंद झाला, तर ओरिएंट सिमेंटचा समभाग दोन टक्क्यांनी घसरून ११७.३५ रुपयांवर बंद झाला.
अदानी समूहाने रणनीती बदलली
हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाने अदानी समूह चांगलाच हादरला आहे. यामुळे गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाचे मार्केट कॅप १४२ अब्ज डॉलरने घसरले आहे. त्यामुळेच या समूहाने आता आक्रमकपणे विस्ताराच्या योजना बॅकबर्नरवर टाकण्यास सुरुवात केली आहे. आता त्यांचे लक्ष पूर्णपणे रोख बचत आणि कर्ज कमी करण्यावर आहे. याच कारणामुळे समूहाने प्रथम DB पॉवर बरोबर करार केला नाही आणि नंतर PTC India Ltd साठी बोली न लावण्याचा निर्णय घेतला.