सचिन सुरजूसे यांची बहीण वडगाव माहोरे येथे राहत असून गुरुवारी बहिणीच्या दिराचे लग्न असल्याने त्या लग्नाला उपस्थित राहण्याकरिता सचिन त्याची दुचाकी क्रमांक MH २७ BY ७८०३ ने वडगाव माहोरे येथे जाण्यासाठी निघाला. रात्री ८ वाजताच्या दरम्यान सचिन हॉटेल आदित्य नजीक वडगाव माहोरे फाट्यावरून जात असताना त्याठिकाणी असलेल्या खड्ड्यात त्याची दुचाकी पडली आणि सचिन गंभीररीत्या जखमी झाला.
अंधार असल्याने तसेच रात्रीची वर्दळ नसल्याने बराच वेळ पडून राहल्याने सचिनला अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. काही नागरिकांना सचिन पडलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी तातडीने नांदगाव पेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सचिनला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र तपासणीदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सचिनला मृत घोषित केले.