जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील बोढरा नियतक्षेत्र परिसरातून विनापरवाना चंदनाची तस्करी करणाऱ्या दोन जणांवर वनविभागाच्या पथकाने कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ किलो वजनाचे चंदनाचे लाकूड हस्तगत करण्यात आली असून तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी देण्यात आली आहे. सलमान खॉ. अबरार खॉ पठाण (वय-३२) आणि शाबीर खॉ अजमेर खॉ पठाण (वय-२४) दोन्ही राहणार कुंजखेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद असे अटक केलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत.

चाळीसगाव वन्यजीव वनपरीक्षेत्रातील बोढरा येथील वनपाल व वनरक्षक हे बोढरा जंगली गस्तीवर असतांना दोन जण आढळून आले. त्यांची अधिक चौकशी केली असतांन त्यांच्या जवळील पिशवीत ५ किलो १५० ग्रॅम वजनाचे चंदनाचे लाकूड, लोखंडी कुऱ्हाड, लहान लोखंडी करवत आणि दोन मोबाईल दिसून आले. दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वनविभागाच्या पथकाने सलमान खॉ अबरार खॉ पठाण आणि शाबीर खॉ अजमेर खॉ पठाण या दोघांना अटक केली.

दिल्ली हादरले! प्रथम शाळकरी मुलीशी मैत्री केली, नंतर अपहरण करून तिला संपवले, कुटुंबीयांना मिळाला कुजलेले शव
बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वनपाल डी.के.जाधव, वनरक्षक अजय महिरे, अमित पाटील, रहिम तडवी, प्रसाद कुळकर्णी, अशोक मोरे, उमेश सोनवणे, बापू अगोणे, लालचंद चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास वनपाल डी.के. जाधव करीत आहे.

गौतम अदानींना तिसरा मोठा झटका! ओरिएंट सिमेंटची आणखी एक मोठी डील हातातून निसटली
चंदनाची तस्करी हे गंभीर प्रकरण असून बोढरा नियतक्षेत्रात चंदन तस्करांची टोळी तर कार्यरत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. आता पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अदानींना मोठा धक्का, एका झटक्यात ५० हजार कोटी रुपये गुल, जाणून घ्या किती घसरले अदानी समूहाच्या शेअर्सचे भाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here