आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव याचे वडील तिलक यादव हे वलनी कोळसा खाणीतील सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांना पहेलवानीची (कुस्ती) आवड होती. उत्तर प्रदेशातील पडरौना जिल्ह्यातील पोखरभिंडा गावातून नोकरीच्या शोधात तिलक यादव लहानपणी नागपुरात आले होते.
वेस्टर्न कोलफील्ड्समध्ये काम करणारे कोळसा खाण कर्मचारी तिलक यादव मूळचे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील. तिलक यांना दोन मोठ्या मुली आणि धाकटा मुलगा उमेश. कोळसा खाणीत नोकरी मिळाल्याने नागपूरजवळील खापरखेड्यात येऊन ते राहू लागले. सुरुवातीला आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कोणत्याही एकाच मुलाने शिकावे, असे तिलक यांना वाटायचे.
उमेश पोलिसात जावे अशी इच्छा होती
उमेशला पोलिसांत नोकरी मिळावी, अशी तिलक यादव यांची इच्छा होती. वडिलांच्या आज्ञेवरून उमेशनेही लष्कर, पोलिसांत भरती होण्यासाठी भरपूर तयारी केली. पण, नशिबाची साथ मिळत नव्हती. टेनिस बॉलने क्रिकेट खेळण्याचा छंद असलेल्या उमेशने एकदा वडिलांना सांगितलं की, तुम्ही माझ्या खेळाने एक तर लोकप्रिय व्हाल, नाही तर बरबादच… उमेश २००८ पर्यंत टेनिस बॉलनेच क्रिकेट खेळला.
विदर्भ संघटनेचा कर्णधार प्रीतम गंधेची उमेशवर नजर पडली. २००८ मध्येच उमेशला पहिल्यांदा रणजी खेळण्याची संधी मिळाली. पहिल्याच डावात त्याने ७५ धावा देऊन ४ बळी मिळवले. याच कामगिरीच्या आधारे त्याला दुलीप ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली.
२०१० मध्ये आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याच्यावर बोली लावली. नोव्हेंबर २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध यादवने कसोटीत पदार्पण केले. तो विदर्भाकडून कसोटीत खेळणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला.
राळेगणसिद्धी गहिवरले! शहीद कॅप्टन सौरभ औटी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार