या प्रकरणी महेश नायक (वय २४), सूरज कालगुडे (वय २१), अमित देशपांडे (वय २६), विशाल उकिर्डे (वय २१) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना दुकानात येऊन खरेदी करावी यासाठी एफसी रोडवरील अनेक दुकानातील कर्मचारी जोरजोरात ओरडून आकर्षित करत असतात. दरम्यान, घडलेला हा प्रकार देखील अशाच प्रकारचा आहे.
अटकेतील आरोपी यांच्यासह इतर ४ ते ५ जण हे एफसी रोडवरील वेगवेगळ्या दुकानात कामाला आहेत. आपल्या दुकानात येऊन ग्राहकांनी खरेदी करावी यासाठी या सर्वांमध्ये चढाओढ सुरू असते. मंगळवारी दुपारी या आरोपींनी एकमेकांच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांवरुन वाद घातला. हा वाद विकोपाला गेला आणि त्यांच्यात शिवीगाळ होऊन मारामारी पर्यंत पोहोचला. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला होता.