नवी दिल्ली : मध्य प्रदेशात ज्योतरादित्य शिंदे – कमलनाथ, राजस्थानात सचिन पायलट – अशोक गेहलोत अशी काँग्रेसमधल्या तरुण – ज्येष्ठांत वाद उफाळून आले आणि पक्षाला मोठी त्याची किंमत मोजावी लागली. परंतु, काँग्रेसमधला आणि यांच्यातील हा वाद इथेच संपलेला नाही. गुरुवारी पक्षाच्या अध्यक्ष यांच्यासमोर अचानक तरुण नेते विरुद्ध ज्येष्ठ नेते असा वाद उफाळून आला. या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. यावर राहुल गांधी यांच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या एका तरुण सदस्यानं त्यांचा जोरदार विरोध केलेला पाहायला मिळाला.

गुरुवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभेच्या खासदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत, राहुल गांधी यांनी सर्व शक्ती पणाला लावूनही पक्ष उभारणीला वेग मिळालेला नाही, असं मत एका नेत्यानं व्यक्त केलं. यावर माजी मंत्री पी चिदंबरम यांनी पक्ष जिल्हा आणि स्थानिक स्तरावर कमी पडत असल्याचं सांगितलं. तर यांनी पक्षाला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला.

वाचा :

वाचा :

यावर, राहुल गांधींचे जवळचे समजले जाणारे राज्यसभेचे खासदार यांनी सिब्बल यांना जोरदार विरोध केला. आत्मपरीक्षण करायचंच असेल तर ते तेव्हापासून व्हायला हवं जेव्हा आपण सत्तेत होतो. सर्वात अगोदर आत्मपरीक्षण २००९ पासून २०१४ पर्यंत व्हायला हवं, असं सातव यांनी म्हटलं. इतकंच नाही तर यूपीए सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या सिब्बल यांच्यावर थेट निशाणा साधताना त्यांच्या कार्याचंही निरीक्षण व्हायला हवं, असं सातव यांनी म्हटलं. ‘यूपीए – २ मध्ये वेळेवर आत्मपरीक्षण झालं असतं तर २०१४ मध्ये काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या नसत्या’ असा टोलाही सातव यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना हाणला.

या बैठकीत सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, ए के एन्टनी, गुलाम नबी आझाद, पी चिदंबरम, आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत खासदार पी एल पुनिया, रिपुन बोरा आणि छाय वर्मा यांनी, ‘राहुल गांधींनी पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष म्हणून सूत्रं हाती घ्यावीत’ अशी मागणी केली.

वाचा :

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here