मुंबई : भारतीय शेअर बाजारात चालू आठवड्यात सलग तीन दिवशी घसरण पाहायला मिळाली आहे. जागतिक मार्केटमधून चांगले संकेत मिळूनही भारतीय बाजारात विक्रीचा जोर दिसून आला. बुधवारच्या जोरदार घसरणीनंतर जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार गुरुवारी किंचित वाढीसह उघडला. मुंबई शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स ३३ अंकांनी वधारला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २० अंकांच्या किंचित वाढीसह १७ हजार ५७४ अंकांवर खुला झाला. पण पॉझिटिव्ह सुरुवात केल्यावर बाजार लाल चिन्हात घसरला.

अदानींना मोठा धक्का, एका झटक्यात ५० हजार कोटी रुपये गुल, जाणून घ्या किती घसरले अदानी समूहाच्या शेअर्सचे भाव
जागतिक बाजारात संमिश्र कल
आशियाई बाजारातील अनेक शेअर बाजार तेजीसह व्यवहार करत आहेत. हँगसेंग ०.७५%, तैवान १.३७%, कोस्पी १.१२%, जकार्ता ०.१७ टक्के तेजीने व्यवहार करत आहेत. तर निक्केई १.३४% घसरणीसह व्यवहार करत असून स्ट्रेट टाइम्स ०.७२ टक्क्यांनी घसरला. याआधी बुधवारी डाऊन जोन्स ०.२६ टक्क्यांनी, तर नॅस्डॅक कंपोझिट ०.१३ टक्क्यांनी वाढून क्लोज झाला.

पडते शेअर्स, घसरती संपत्ती… तरीही अदानींच्या शेअरवर ब्रोकरेजला भरवसा, दिला खरेदीचा सल्ला
भारतीय बाजारातील क्षेत्रीय निर्देशांक
गुरुवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात बँकिंग सेक्टर, ऑटो, फार्मा, मीडिया, एनर्जी आणि कंझ्युमर ड्युरेबल्सच्या शेअर्समध्ये बाजार उघडताच घसरण झाली, तर आयटी, मेटल, एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. याशिवाय स्मॉल कॅप निर्देशांक वर तर मिडकॅप निर्देशांकात घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्समधील ३० पैकी १२ समभाग तेजीसह व्यवहार करत असताना १८ शेअर्समध्ये घसरत होतेय. तसेच निफ्टीच्या ५० समभागांपैकी २१ वाढून तर २९ समभाग घसरणीच्या लाल चिन्हात व्यवहार करत आहेत.

हिंडेनबर्गचा वार खोलवर! पुन्हा तोंडावर आपटले अदानी शेअर्स, काही तासांत ४,५५,४६,३२,५०,००० स्वाहा
कोणते शेअर्स पडले, कोणते वाढले
बाजाराच्या सुरुवातीच्या सत्रात टाटा स्टील ०.४९ टक्के, टीसीएस ०.४४ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.३३ टक्के, एचसीएल टेक ०.२७ टक्के, पॉवर ग्रिड ०.२३ टक्के, टाटा मोटर्स ०.२१%, सन फार्मा ०.१९ टक्के, लार्सन ०.१६ टक्के, आयटीसी ०.१३ टक्के आणि भारती एअरटेल ०.१० टक्के उसळी घेऊन व्यवहार करत आहेत. तर एशियन पेंट्स १.७८ टक्के, बजाज फिनसर्व्ह १.२० टक्के, बजाज फायनान्स १.११ टक्के, इंडसइंड बँक ०.८२ टक्के, टायटन ०.८० टक्के घसरून लाल चिन्हात व्यवहार करत आहेत.

बुधवारी बाजाराची स्थिती
फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीच्या भीतीने बुधवारी देशातील शेअर बाजार आपटला. सेन्सेक्स ९२७.७४ अंकांनी कोसळून ५९,७४४.९८ अंकांवर तर निफ्टी २७२.४० अंकांची घसरण नोंदवत १७,५५४.३० अंकांवर स्थिरावला. बँकिंग, धातू आणि आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री पाहायला मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here