वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील खंमबाळपाडा येथील शंकर मंदिराजवळ असलेल्या एका चाळीत शिंदे कुटुंब गेल्या १० वर्षांपासून या परिसरात राहात आहेत. श्यामसुंदर हे बीएमसीमध्ये कामाला होते. ते सध्या रिटायर झाल्याने घरी असायचे. त्यांची पत्नी घरकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होती. तर मुलगा तेजस हा डोंबिवली मधील एका महाविद्यालयात १४ वीला शिकत होता. श्यामसुंदर यांना पूर्वी दारूचे व्यसन होते. सध्या त्यांनी दारू सोडली होती. मात्र, त्यामुळे होणारी चिडचिड यामुळे त्यांचे घरी भांडण, मारामारी होत असे.
दरम्यान, बुधवारी दुपारी तेजस व श्यामसुंदर हे दोघेच घरी होते आणि यावेळी त्यांच्यात वाद झाला. वाद झाल्यानंतर वडील झोपी गेले पण तेजस याचा मनात राग होता. या रागाच्या भरात त्याने घरातील जाते वडिलांच्या डोक्यात घातले. एवढेच नाही तर भाजी कापण्याच्या सुरीने वडिलांचा गळा कापला. हत्या केल्यानंतर तो स्वतः रामनगर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि आपण वडिलांनी मारले असल्याचे पोलिसांना सांगितले.
नंतर डोंबिवलीचे सहाय्यक पोळीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आफळे, सह्यायक पोलीस निरीक्षक पांडुरंग पीठे, वैभव चुंबळे, पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य धोंडे, पोलीस अंमलदार संजय फड, रवींद्र बांगल यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि श्यामसुंदर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणी बाई रुग्णालयात पाठवला. आरोपी मुलगा तेजस याला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे.