चंदीगढः ‘तब्बल तीन वर्षांनंतर माझ्या मुलाला समोर पाहत होतो. त्याला पाहिल्यानंतर मी माझे अश्रू रोखू शकलो नाही. मी त्याला जवळ घेतले आणि यापुढे कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही असं वचन दिलं’, हे वाक्य आहेत सुजन माझी यांची. सुजन यांच्या पत्नीने तिच्या १० वर्षांच्या मुलासह स्वतःला घरात तीन वर्ष कोंडून घेतलं होतं. पोलिसांनी या दोघांचीही सुटका केल्यानंतर सुजन आपल्या भावनांवर ताबा ठेवू शकले नाहीत. गेले तीन वर्ष ते आपल्या परिवारांपासून दूर होते. मात्र, त्यांच्या पत्नीने तीन वर्ष स्वतःला कोंडून का घेतले, याचे धक्कादायक कारण समोर आलं आहे.

करोना महामारीच्या काळात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर सगळेच घरात अडकून पडले होते. मात्र, जसं जसं करोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागली तसे नियम शिथिल करण्यात आले. मात्र, सुजन यांच्या पत्नी मुनमुन यांनी करोनाचा इतका धसला घेतला की त्या घराबाहेर पडायलाच तयार झाल्या नाहीत. इतकंच नव्हे तर त्यांच्या १० वर्षांच्या मुलालाही त्यांनी घराबाहेर येऊ दिलं नाही. तब्बल तीन वर्ष त्यांनी घरातच काढले. हरयाणच्या गुरुग्राममध्ये हा प्रकार घडला आहे.

फ्री वे ते ग्रँट रोड अंतर आता ७ मिनिटांत कापता येणार; कुठून, कुठपर्यंत जोडणार उन्नत मार्ग, वाचा सविस्तर
मुनमुन माझी यांनी २०२०साली आपल्या १० वर्षांच्या मुलासह स्वतःला घरातच कोंडून घेतले. मुनमुन यांनी कामानिमित्त घराबाहेर गेलेल्या तिच्या नवऱ्यालाही घरात येऊ दिलं नाही. मात्र, सुजन यांनी घराबाहेर राहून त्याचा कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण केल्या. त्याने त्याच परिसरात भाड्याने घर घेतलं. तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तो तिच्याशी व मुलांशी संपर्कात होता. तसंच, त्यांच्यासाठी किराणा सामान, भाज्याफळंही खरेदी करुन दरवाजाबाहेर आणून ठेवायचा. तसंच, त्याने मुलाच्या शाळेची फीदेखील भरली. सिलेंडर संपल्यानंतरही तिने गॅस वापरणं बंद केलं. त्याएवजी इंडक्शन वापरुन स्वयंपाक करु लागली.

गोखले पुलाचे काम पावसाळ्याआधी पूर्ण न झाल्यास पालिकेने सांगितला प्लान B; अशी असेल पर्यायी व्यवस्था
सुजनने त्याच्या पत्नीला समजवण्याचा खूपदा प्रयत्न केला. मात्र, ती त्याचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. जोपर्यंत मुलांसाठी लस येत नाही तोपर्यंत मी घराबाहेर पडणार नाही, असं तिने सांगितले. अखेर हतबल झालेल्या सुजनने पोलिसांची मदत घेतली. सुरुवातीला हे कौटुंबिक वादाचे प्रकरण असल्याचं वाटल्याने पोलिसांनी ते गांभीर्याने घेतलं नाही. नंतर सुजनने मुनमुन आणि पोलिसांचे व्हिडिओ कॉलवरुन बोलणे करुन दिले. तेव्हा हे प्रकरण गंभीर असल्याचे त्यांना जाणवले. पोलिसांनी आणि बाल कल्याण विकास अधिकाऱ्यांच्या टीमने दरवाजा तोडून रुग्णालयात दाखल केलं आहे. महिलेला करोनाच्या काळात अँझायटी झाली असावी. त्यामुळं ती अशी वागत असावी, असा डॉक्टरांचा अंदाज आहे.

घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकची कटकट मिटणार; ठाणे टाळून आता मुंबईकरांना शहराबाहेर पडता येणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here