केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेली महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीची लढत होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत केपटाऊनमध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघापुढं भारताचं यावेळी तगडं आव्हान आहे. टीम इंडियाची खेळाडू ऋचा घोष हिनं ऑस्ट्रेलियाला इशारा दिला आहे.

टीम इंडियाची खेळाडू ऋचा घोष हिनं ऑस्ट्रेलियाला यावेळी सोडणार नाही, कांगारुंना पराभूत करण्यासाठी गरज पडल्यास यावेळी फक्त षटकारांची आतिषबाजी करेन, असं असा इशारा ऋचा घोष हिनं दिला आहे

ऑस्ट्रेलियाला पराभूत करणार

ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेट टीम मजबूत आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की त्यांना पराभूत करता येणार नाही, आम्ही त्यांना यापूर्वी पराभूत केलं आहे ,आता देखील पराभूत करणार आहे, असं ऋचा घोष म्हणाली. ऋचा घोषनं ऑस्ट्रेलियाला इशारा दिला असून आता मॅचमध्ये नेमकं काय घडणार हे पाहावं लागणार आहे.

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत षटकार लगावले नाहीत यासंदर्भात विचारलं असता ऋचा घोषनं ते सर्व मॅचमधील स्थितीवर अवलंबून असतं, असं म्हटलं. जर फक्त चौकारांनी काम होत असेल तर षटकारांची गरज काय, असं ऋचा घोष म्हणाली. आज आस्ट्रेलियाच्या विरुद्ध सेमीफायनलच्या मॅचमध्ये आवश्यकता असल्यास षटकार मारेन, असं ऋचा घोष म्हणाली.

तात्या, विद्युतदाहिनीत बॉडी टाकली नि… रात्री ११.३० ला वसंत मोरेंना स्मशानभूमीतून फोन

ऋचानं आतापर्यंत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ४ सामन्यांमध्ये १२२ च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. तर, तिचा स्ट्राइक रेट १४० च्या वर आहे. ग्रुप स्टेज मध्ये भारताला ३ मॅचमध्ये विजय मिळाला होता. त्यापैकी २ मॅचमध्ये ऋचाची कामगिरी महत्त्वाची होती.

बापाला दारूचं व्यसन, पोरगा कंटाळला, रागात पित्याला संपवलं; पोलीस ठाण्यात हजर झाला…

ऋचानं चार सामन्यांमध्ये १४ चौकार आणि २ षटकार लगावले आहेत. सेमी फायनलपपूर्वीच्या पत्रकार परिषदेत ऋचानं ऑस्ट्रेलियापुढं टीम इंडिया ताकदीनं उतरणार असल्याचं सांगितलं. आजच्या सेमीफायनलमध्ये ऋचाची कामगिरी देखील टीम इंडियासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Video : पाण्याच्या बाटल्या फेकल्या, धक्काबुकी, दिल्ली महापालिकेत रात्रभर राडा, भाजप-आपचे नगरसेवक भिडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here