मुंबई : भारताच्या इक्विटी मार्केटला गेल्या काही काळापासून कमकुवत रुपया आणि अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरच्या घसरणीचा असे दुहेरी धक्के बसत आहेत. बुधवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी खूप वाईट ठरला. एका दिवसात गुंतवणूकदारांना अनेक देशांच्या जीडीपीएवढे नुकसान सहन करावं लागलं. भारतीय शेअर बाजारात काल सुमारे ४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असून बाजार इतक्या वेगाने कोसळला की एका झटक्यात २०० हून अधिक समभाग लोअर सर्किटला धडकले. त्यामुळे भारतीय शेअरचे मार्केट कॅपही घसरले.

युनायटेड किंगडम (यूके किंवा ब्रिटन) जवळपास नऊ महिन्यांत प्रथमच भारताला मागे टाकून जगातील सहाव्या क्रमांकाचे इक्विटी मार्केट बनले. मे २०२२ नंतर पहिल्यांदाच ब्रिटन भारताला मागे टाकून जगातील सहाव्या क्रमांकाची इक्विटी मार्केट बनवले आहे.

Share Market Opening: जागतिक बाजारातील संमिश्र संकेत, भारतीय मार्केटची सपाट सुरुवात
शेअर बाजारात अदानी इफेक्ट
अदानी समूहाच्या शेअर्समधील वाढता विक्रीचा जोर आणि काल शेअर बाजारात ९२७.७४ अंकांच्या घसरणीने सारा खेळच बिघडवला. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार ब्रिटनमधील प्राथमिक सूचीचे एकत्रित बाजार भांडवल, ETFs आणि ADRs वगळता, मंगळवारी सुमारे $३.११ ट्रिलियनपर्यंत पोहोचले, जे त्यांच्या भारतीय समकक्षांपेक्षा सुमारे $५.१ अब्ज जास्त आहे. २९ मे पासून कालपर्यंत असे घडलेले नव्हते.

गुंतवणूकदारांसाठी NSE चा मोठा निर्णय… आता बाजार संध्याकाळपर्यंत काम करणार, ट्रेडिंग सेशनचे तास वाढले
गेल्या वर्षी जागतिक समभागांपेक्षा अधिक कामगिरी केल्यावर यूकेचा FTSE ३५० निर्देशांक, ज्यामध्ये FTSE १०० आणि देशांतर्गत केंद्रित FTSE २५० मधील स्टॉकचा समावेश आहे. या वर्षी आतापर्यंत ५.९% वाढून एमएससीआय ऑल-कंट्री वर्ल्ड इंडेक्समध्ये ४.७% वाढ झाली आहे. हे अंशतः ब्लू-चिप FTSE १०० च्या विक्रमी उच्चांकाने चालवले होते, जे गेल्या आठवड्यात प्रथमच ८ हजाराच्या वर पोहोचले होते, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर केंद्रित कंपन्यांच्या वर्चस्वामुळे कमकुवत स्टर्लिंगमधून बेंचमार्क नफा मिळण्यास मदत झाली.

पडते शेअर्स, घसरती संपत्ती… तरीही अदानींच्या शेअरवर ब्रोकरेजला भरवसा, दिला खरेदीचा सल्ला
भारतासमोर संकटाचं डोंगर
रुपयाच्या कमजोरीसह अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने शेअर्समध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याच्या आरोपांमुळे भारतीय बाजाराची स्थिती कमकुवत होत असून मार्केट अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीतील घसरणीचा देखील सामना करत आहे. एमएससीआय इंडिया इंडेक्स या वर्षी आतापर्यंत ६.१% घसरला आहे, तर गौतम अदानी यांच्या मालकीच्या कंपन्यांच्या समूहाने – आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक – बाजार भांडवलात जवळपास $१४२ अब्ज गमावले आहेत.

आजपासून बाजारात बदल
नॅशनल स्टॉक एक्सचेंजन (एनएसई) ट्रेडिंगच्या वेळेत मोठा बदल केला आहे. यानुसार, आता व्याजदर व्युत्पन्न करारासाठी व्यापाराचे तास संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वाढवण्यात आले असून हा निर्णय आजपासून म्हणजेच २३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here