गोंडाः नवरदेव सजला, लग्नस्थळी जाण्यासाठी घरातून वरात घेऊन निघाला. पण अचानक प्रेयसीने रस्त्यातच वरात अडवली अन् पुढे नाट्यमय घडामोडी घडल्या. उत्तर प्रदेशवरुन झारखंड येथे निघालेल्या नवरदेवाला त्याच्या प्रेयसीने चांगलाच धडा शिकवला आहे. गोंडा जिल्ह्यात राहणाऱ्या २१ वर्षीय महिलेचे या तरुणासोबत सूत जुळलं त्यांनी लग्नदेखील केल्याचा तिचा दावा आहे. मात्र, तरुणाच्या घरच्यांनी हुंड्यासाठी त्याचं दुसरं लग्न करण्याचा घाट घातला, अशी तक्रार या तरुणीने दिली आहे.
यावेळी पोलिस ठाण्यात प्रियांकाच्या आई-वडिलांनाही बोलवण्यात आले. नंतर दोन्ही कुटुंबाच्या लोकांची समजूत घालून दोघांचंही लग्न लावून देण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरदेव आणि वधूचे आई-वडिल सामान्य शेतकरी आहेत.