पुणे : रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणांचा पाठलाग करुन त्यांना लुटल्याच्या दोन घटना पुण्यात उघडकीस आल्या आहेत. एका इंजिनिअरसह दोघांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. वाकडेवाडी एसटी बस स्थानक परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणांचा पाठलाग करीत त्यांना लुटण्याचा प्रयत्न दोन वेगवेगळ्या घटनेत दोघा जणांनी केला होता. पैसे देण्यास विरोध केल्याने चोरट्यांनी दोघाही जणांवर कटरने वार करुन गंभीररित्या जखमी केले आहे. नागरिकांनी ही घटना होताना पाहिल्यानंतर चोरांचा पाठलाग केला. एका हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना सोमवार २० फेब्रुवारीला रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास शिवाजी नगरमधील वाकडेवाडी परिसरात घडली आहे.

योगेश जाधव (वय २७ वर्ष, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) आणि संकेत साबळे (वय २० वर्ष, रा. कोथरुड) अशी जखमींची नावे आहेत.

२३ वर्षीय तरुणाला हाव सुटली, हातावर पोट असलेल्या महिलेचा खून, सात दिवसात गूढ उकललं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश हा २० फेब्रुवारीला वाकडेवाडी एसटी स्थानक परिसरातून रस्त्याने पायी चालला होता. त्यावेळी अंधाराचा फायदा घेत दोघा चोरट्यांनी त्याला गाठून पैशांची मागणी केली. ३०० रूपये काढून घेत चोरट्यांनी योगेशचा मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने विरोध केल्यामुळे रागातून चोरट्याने त्याच्यावर कटरने वार केला. त्यामुळे योगेशने आरडओरड केल्याने परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. त्यामुळे पळून जात असताना चोरटा खाली पडून जखमी झाला. नागरिकांनी धरलं आणि त्याला खडकी पोलिसांच्या ताब्यात दिले.

तात्या, विद्युतदाहिनीत बॉडी टाकली नि… रात्री ११.३० ला वसंत मोरेंना स्मशानभूमीतून फोन
दरम्यान, दुसर्‍या घटनेतही चोरट्यांना तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याच्यावर कटरने वार करुन जखमी करण्यात आले. संकेत साबळे असे जखमीचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी चोरट्यांच्या दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती खडकी पोलिसांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम तपास करीत आहेत.

वधूसाठी लग्नाची मिरवणूक घेऊन वर हॉस्पिटलमध्ये पोहोचला, बेडलाच बनवले मंडप!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here