अंबुज तिवारी व त्याची पत्नी नीलम या दोघांचा विवाह २०१६मध्ये झाला होता. त्यांना एक मुलगादेखील झाला. मात्र अंबुजला नीलमच्या असल्याने त्यांच्यात नेहमी भांडण होत. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी नीलम ठाणे येथे आपल्या माहेरी राहण्यास गेली. अधूनमधून अंबुजला भेटण्यासाठी घणसोली येथे येत असे. २२ जुलै रोजी ती घणसोली येथे आली. यावेळी दोघेही घणसोलीतील अर्जुनवाडी येथे राहणारा मित्र श्रीकांत चौबे याच्या फ्लॅटवर गेले. तेथेच राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी या दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद झाले. या भांडणात अंबुजने नीलमची ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून तिची हत्या केली.
श्रीकांत आणि त्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नीलमचा मृतदेह ड्रममध्ये लपवून ठेवला. तो ड्रम श्रीकांतच्या मालकीच्या टेम्पोमधून लोणावळ्याच्या दिशेने नेऊन मुंबई-पुणे महामार्गालगत खोपोली येथे झुडुपात टाकून दिला. त्यानंतर अंबुज ट्रेन पकडून उत्तर प्रदेशला निघून गेला. मात्र अंबुज तिवारी हा घरी न आल्याने त्याच्या वडिलांनी रबाळे पोलिस ठाण्यात अंबुज व त्याची पत्नी दोघे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने रबाळे पोलिसांनी या दोघांचा शोध सुरू केला असताना अंबुज २८ जुलै रोजी घणसोलीत दाखल झाला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Thank you ever so for you article post.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.