या प्रकरणी मिळालेली मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच.२० बि.एन.९११४ या क्रमांकाची कार पैठणहून पाचोडच्या दिशेने चालली होती. तर एम.एच.२० बि.एन.९११४ या दुचाकीवरून स्मसुदिन आणि प्रकाश हे दोघेही पाचोड फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येत होते. दरम्यान, दोन्ही समोरासमोर आल्याने दोघांचे नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. कारची धडक लागताच दुचाकीसह दोघेही दूरवर फेकले गेले. भीषण अपघात झाल्याचे पाहून चालक कार सोडून पसार झाला.
दरम्यान, मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही निपचित पडले होते. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार सुधीर ओव्हाळ, जमादार गोपाळ पाटील, महेश माळी, भगवान धांडे, मुकुंद नाईक आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गंभीर जखमींना उपचारासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच दोघांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद देण्यात आली आहे.