मुंबई : गेल्या एक महिन्यापासून गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण सुरु आहे. गेल्या महिन्याच्या (जानेवरी) २४ तारखेला हिंडेनबर्ग रिसर्च अहवाल समोर आल्यापासून अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशन या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बु़डाले आहेत.

अदानी टोटल गॅसमध्ये सर्वाधिक घसरण
अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये बाजाराच्या गेल्या २१ सत्रांमध्ये सर्वाधिक ७८.५ टक्के घसरण झाली असून कंपनीचा शेअर २२ फेब्रुवारीला ८३४.९५ रुपयांपर्यंत घसरला. २४ जानेवारी २०२३ रोजी या शेअर्सची किंमत ३,८८५.४५ रुपये होती. गुरुवारी देखील २३ फेब्रुवारीला शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

बाजारात अदानी इफेक्ट सुरूच! भारताच्या हातून निसटला जगातील शक्तिशाली शेअर बाजाराचा मुकूट
शेअर्स ७०% हून अधिक घसरले
या कालावधीत अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्सच्या किमतीत ७१.८ टक्क्यांनी घसरण झाली. अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्सची किंमत २२ मार्च रोजी ५३९.०५ रुपये होती. बुधवारी बाजार बंद होताना या शेअर्सची किंमत ७८९.२० रुपये होती.गेल्या एक महिन्याच्या कालावधीत अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये २३.३० टक्क्यांनी घट झाली आहे. बुधवारी शेअर बाजार बंद होताना कंपनीच्या शेअर्सची किंमत ५४७.१० रुपये होती.

पडते शेअर्स, घसरती संपत्ती… तरीही अदानींच्या शेअरवर ब्रोकरेजला भरवसा, दिला खरेदीचा सल्ला
गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान
बुधवारी अदानी विल्मरच्या शेअरची किंमत ३९०.३० रुपये होती. गेल्या एका महिन्यात हा शेअर्स २८.३० टक्क्यांनी खाली आला आहे. अंबुजा सिमेंटचा शेअर्सही गेल्या एका महिन्यात जवळपास २९.२० टक्क्यांनी घसरला आहे. या शेअर्सची किंमत २२ फेब्रुवारी रोजी ३३५.४० रुपये होती. या कालावधीत एसीसी सिमेंट्सच्या शेअर्समध्ये २४.९ टक्क्यांची घसरण झाली असताना एनडीटीव्हीचा शेअर २८.९० टक्क्यांनी घसरला आहे. तर अदानी पॉवर ४०.८० टक्क्यांनी कोसळला. या मोठ्या पडझडीत गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका बसला आहे.

हिंडेनबर्गचा वार खोलवर! पुन्हा तोंडावर आपटले अदानी शेअर्स, काही तासांत ४,५५,४६,३२,५०,००० स्वाहा
मार्केट कॅप घटले
शेअर्स सततच्या घसरणीमुळे गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २४ जानेवारीपासून तब्बल ११ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांचेबाजार मूल्य एक महिन्याच्या कालावधीत ५७% पेक्षा जास्त घसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here