नवी दिल्ली: विराट कोहली आणि त्याचे डान्स मूव्हज त्याच्या क्रिकेट शॉट्स इतकेच प्रसिद्ध आहेत. विराट कोहली एखाद्या लग्नात वा कार्यक्रमात गेला आणि त्याने तिथे डान्स केला नाही, हे शक्यच नाही. असाच एका विराट कोहलीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तो ‘सारी के फॉल सा…’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

विराट कोहली लग्नात पोहोचला आणि डान्स करत नाही, असं कसं होऊ शकतं. फक्त हा व्हायरल व्हिडिओ पहा. तो बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत ‘सारी के फॉल सा…’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका जुन्या व्हिडिओमध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहली बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत डान्स करताना दिसत आहे.
IND vs AUS:ऑस्ट्रेलियाची वनडे विश्वचषकाची तयारी सुरु, भारताविरुद्धच्या मालिकेसाठी धाकड खेळाडूंचा संघ
व्हायरल व्हिडिओमध्ये, कोहली आणि सोनाक्षी सिन्हा प्रसिद्ध बॉलिवूड गाणे ‘सारी के फॉल सा’ वर डान्स करताना दिसत आहेत. कोहली आणि सोनाक्षी एकमेकांसोबत स्टेप्स जुळवताना दिसतात आणि कोहलीच्या डान्स मूव्ह्स खरोखरच कौतुकास्पद आहेत. सोनाक्षी जशा स्टेप्स दाखवत आहेत तशाच स्टेप्स कोहली पूर्णपणे जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे गाणे सोनाक्षीच्या चित्रपट ‘आर. राजकुमार’ चित्रपटातील आहे, ज्यामध्ये तीन शाहिद कपूरसोबत काम केले आहे. असे म्हटले जात आहे हा व्हिडिओ सध्याचा भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या २०१६ मध्ये झालेल्या लग्नाचा आहे.

अनेकांनी या स्टार खेळाडूच्या धमाकेदार डान्स मूव्ह्सचे कौतुक केले आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की कोहली सर्वोत्तम क्रिकेटरसोबतच त्याच्या मस्तीखोर अंदाजासाठीही प्रसिद्ध आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घ्यायचा हे त्याला चांगलंच माहीत आहे. रोहित शर्माने मुंबईत एका शानदार सोहळ्यात रितिका सजदेहशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला अनेक क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती.

सारा टेलरने दिली पार्टनरच्या प्रेगन्सीची आनंदाची बातमी, म्हणाली ‘ती सर्वोत्तम आई होईल’
त्यावेळी भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे होते. नंतर तो तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार झाला. सध्या रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे आणि कोहली त्याच्यासोबत खेळत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली लढत देताना दिसत आहेत. या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-० अशी आघाडी मिळवली आहे. या मालिकेतील तिसरा सामना इंदूरमध्ये होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here