यावेळी अमोल साळवे याने धारदार शस्त्राने विकासच्या पोटात आणि डोक्यात जबर वार करून त्यास गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विकासला डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित अमोल वसंत साळवे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याच्यासोबत त्याचा मामा संशयित सुनील मोरे आणि त्याचा दाजी संशयित राहुल भीमराव उजगीरे हे देखील असल्याचे सांगितले. या जबाबानुसार पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सुनील मोरे यास ताब्यात घेतले असून राहुल उजागिरे हा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, नाशिक शहरात गेल्या दोन दिवसात तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. दारूच्या नशेत पतीने पत्नीला मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या घटनेत पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करत स्वतः आत्महत्या केली आहे तर तिसऱ्या घटनेत बहिणीकडे लग्नासाठी तगादा लावण्याच्या कारणातून भावाने तरुणाची हत्या केली आहे. या घटनेमुळे नाशिक शहर हादरून गेले आहे.