नुकताच महाराष्ट्र एसएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला. राज्यातील ९५ टक्क्यांहून अधिक मुलांनी परीक्षेत यश मिळवले. अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी झगडून हे यश मिळवले आहे. मुंबईतील आझाद मैदानाबाहेरच्या फूटपाथवर राहणाऱ्या अस्मा शेखही दहावीची परीक्षा ४० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करून तिनं हे यश मिळवलं. पावसाच्या दिवसात प्लास्टिकच्या शेडखाली बसून तिनं अभ्यास केला. तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अस्माबद्दल माहिती मिळाल्यानतंर आमदार प्रताप सरनाईक यांनी तिच्याशी संपर्क साधला. तिचं अभिनंदन केलं व तिला नोकरी व घर मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.
ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. ‘अस्माच्या पुढील शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून फोर्ट परिसरातच तिला पार्ट टाइम जॉब मिळवून देणार आहे,’ असं सरनाईक म्हणाले. ‘अस्माला स्वत:चं घर नाही. आई-वडील आणि भावाबरोबर ती राहते. खरंतर, मुंबई, ठाणे, व मीरा-भाईंदरमध्ये रस्ता रुंदीकरणामुळं बाधित होणाऱ्यांना एमएमआरडीएकडून जशी घरं दिली जातात, त्याच पद्धतीनं अस्माला एक छोटंसं घर अस्माला मिळावं असा माझा प्रयत्न राहील,’ असं सरनाईक म्हणाले. रस्त्यावर लिंबू सरबत विकणाऱ्या आपल्या वडिलांना फूटपाथवरून स्वत:च्या घरात न्यायचं तिचं स्वप्न आहे. त्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करू,’ असा शब्द सरनाईक यांनी दिला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
Thank you ever so for you article post.
A big thank you for your article.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.