धुळे : शहरालगत असलेल्या मोहाडी उपनगराजवळ शेतात एका तरुणाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.

सतीश बापू मिस्तरी (वय ३० वर्षे, राहणार नित्यानंद सोसायटी मोहाडी उपनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. सतीश मिस्तरी या तरुणाची निर्घृण हत्या करून त्याचे शीर धडापासून वेगळे केले आहे. धुळे पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे.

Dhule : शेती कामासाठी दोन तरुण धुळ्यात आले, नियतीच्या मनात वेगळचं होतं; जे घडलं ते धक्कादायकच
सदर तरुण हा मित्रांसोबत या शेतात रात्री पार्टी करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या पार्टी दरम्यान या तरुणाचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. मोहाडी पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. सतीश मिस्तरी याच्या खुनाने पुन्हा मोहाडीसह धुळे शहर हादरले आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
धुळे हादरले; धारदार शस्त्राने वार करत पत्नीला संपवले, नंतर पतीने विष घेत उचलले टोकाचे पाऊल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here