पालघर पूर्वेस असलेल्या सेंट जॉन महाविद्यालयात जाण्यासाठी रेल्वे पुलाचा वापर न करता रेल्वे रुळ ओलांडण्याचा निर्णय तिने घेतला. रेल्वे रुळ ओलांडून जात असतानाच भरधाव वेगाने आलेल्या तेजस एक्सप्रेस ट्रेनने हंसीला जोरदार धडक दिली. तेजस एक्सप्रेस ट्रेनच्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
पोलिसांनी महाविद्यालयीन आणि तिच्याकडे असलेल्या इतर ओळखपत्रावरुन हंसीची ओळख पटवली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना संपर्क करत याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली. १८ वर्षाच्या हंसी सिसोदिया हिचा रेल्वे दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रेल्वे स्थानकावर वारंवार उद्घोषणा होत असतात की कुणीही रेल्वे रुळ ओलांडू नये. तरीही प्रवासी सर्रासपणे त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांमध्ये प्रवाशी जीव गमावतात. त्यामुळे थोडशासाठी आपला जीव धोक्यात घालू नका. रेल्वे रुळ ओलांडण्याऐवजी नेहमी रेल्वे पुलाचा वापर करा.