नवी दिल्ली : एकावेळी जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान असलेल्या गौतम अदानी यांच्यावर आता पहिल्या २० अब्जाधिशांच्या यादीतूनही बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे. अमेरिकन रिसर्च कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाने अदानी समूहाला इतका मोठा जोरदार धक्का दिला की अजूनही अदानी ग्रुप आणि शेअर्स स्वतःला सावरू शकले नाही. एकीकडे शेअर्सची गळती सुरु असताना गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्येही घसरण सुरूच आहे. आणि आता स्थिती अशी की त्यांना दररोज कोट्यवधींचे नुकसान होत आहे.

शेअर्सच्या घसरणीदरम्यान अदानी आता जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत आणखी खाली घसरले २९व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. २०२ मध्ये गौतम अदानी संपत्तीच्या नुकसानीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. एक काळ असा होता जेव्हा गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यापासून काही पावले दूर होते. पण आता चित्र बदलले आहे आणि हिंडेनबर्गच्या अहवालाने खेळचं बिघडवला. दररोज कोट्यवधी रुपये कमावणारे गौतम अदानी वेगाने यादीत खाली सरकत आहेत. प्रथम ते श्रीमंतांच्या यादीत पहिल्या १० मधून, यानंतर टॉप २० मधून आणि आता ते ३०व्या स्थानावर घसरण्याच्या जवळ आहे. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनाही तोटा सहन करावा लागला आहे पण ते पहिल्या २० अब्जाधिशांमध्ये कायम आहे. लक्षणीय म्हणजे आता अंबानींची संपत्ती गौतम अदानीपेक्षा दुप्पट झाली आहे.

काही केल्या घसरण थांबेना! हिंडेनबर्गची चेतावणी खरी ठरतेय?अदानींच्या कंपन्यांची बिकट अवस्था
अंबानींच्या तुलनेत किती गमावली
वर्षाच्या सुरुवातीला आतापर्यंत गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींच्या तुलनेत १४ पटींनी संपत्ती गमावली आहे. पण २०२३ वर्ष दोघांसाठी फलदायी ठरताना दिसत नाही. गौतम अदानी आणि मुकेश अंबानी या वर्षी संपत्तीच्या नुकसानीत आघाडीवर आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांची यावर्षी ७७ अब्ज डॉलर्सहून अधिक संपत्तीत घट झाली असून यंदा संपत्तीच्या नुकसानीच्या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, अंबानीबद्दल बोलायचे तर त्यांना ५.६५ अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे सध्या ८१.५ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. तर अदानींची एकूण संपत्ती आता $४२.७ अब्ज इतकी राहिली आहे. अशा स्थितीत पाहायचे झाल्यास तर मुकेश अंबानींकडे अदानींच्या दुप्पट संपत्ती आहे.

Hindenburg Impact: अदानी वादाचे पडसाद परदेशातही, लाखो पेन्शनधारकांच्या पैशांवर टांगती तलवार
पहिल्या १० मध्ये एकही भारतीय नाही
ब्लूमबर्गच्या यादीनुसार, जगातील १० श्रीमंतांच्या यादीत सध्या एकही भारतीय नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी ८१.५ अब्ज डॉलर्ससह १२व्या स्थानावर असून ब्लूमबर्गच्या यादीत फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट आणि कुटुंब १८९ अब्ज डाॅलरच्या एकूण संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहेत. यानंतर एलन मस्क दुसऱ्या स्थानावर आहेत. त्याची एकूण संपत्ती १८३ अब्ज डाॅलर एवढी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here