अकोला : रक्तदान हे श्रेष्ठदान, असे सांगितलं जाते. परंतु, आज रुग्णांना या रक्तासाठी रक्तपेढ्यांना प्रक्रिया शुल्क द्यावे लागत आहे. या प्रक्रिया शुल्कात शासनाने वाढ केल्याने आता मृत्यूच्या दाढेतील रुग्णांनाही महागाईचे चटके सोसावे लागणार आहेत. रक्ताच्या या दरवाढीनंतर ‘वाह रे सरकार… आता ‘रक्त’ही महाग केले, अशा प्रतिक्रिया रुग्ण अन् त्यांच्या नातेवाईकांमधून व्यक्त केली जात आहे. रक्त भाववाढ मागे घेण्यात यावी, अशा मागणीचे पत्र अकोल्यात रुग्ण सेवकांनी स्वतःच्या रक्ताने लिहत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

सध्या महागाईचा काळ सुरु आहे त्यात जीवनावश्यक असले तरी पेट्रोल, डिझेल अन् गॅस दरवाढ या गोष्टींची आता जनसामान्यांना सवय झाली. मात्र, रक्ताच्या किंमती वाढल्याने नागरीकांना चांगलाच शॉक लागला आहे. सामाजिक दायित्व म्हणून अनेक जण रक्तदान करतात. परंतु, प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली शासनानेही वाढ केली. यासंदर्भात ८ फेब्रुवारीला सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय काढला असून, तसे पत्र शासकीय आणि खासगी रक्तपेढ्यांना पाठविले आहे. त्यानुसार शासकीय रक्तपेढीत होल ब्लड आणि ‘पीआरसी’ साधारणत: १०० रुपये, तर खासगी रक्तपेढ्यांमध्ये साधारणत: १५० रुपयांची वाढ झाल्याचं समोर आलंय.

आता रक्ताची ही दरवाढ म्हणजे रुग्ण अन् त्यांच्या नातेवाईकांसाठी दुष्काळात तेरावा महिना, असेच समजावं लागणार. काही वर्षापुर्वी २०१४ मध्ये रक्त प्रक्रिया शुल्कात दरवाढ करण्यात आली. मात्र, शासकीय रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीने जुनेच दर कायम ठेवले. त्यामुळे आतापर्यंत येथील रुग्णांना प्रक्रिया शुल्कासाठी ८५० रुपये द्यावे लागत होते. परंतु नव्याने झालेली दरवाढ लागू करण्याचे पत्र प्राप्त झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून नवे दर लावण्यात येणार. त्यामुळे येथील प्रक्रिया शुल्काचे दर थेट ३५० रुपयांनी वाढणार आहेत.

असे आहे सुधारित प्रक्रिया शुल्क
(प्रती युनिट)प्रकार –शासकीय रक्तपेढी – खासगी रक्तपेढी
होल ब्लड – – ११०० – १५५०
पॅक रेड सेल (पीआरसी) – ११०० – १५५०

वडिलांसोबतचा प्रवास अखेरचा ठरला; मुंबई-पुणे हायवेवरील अपघातात ४ वर्षीय चिमुकल्याचा करुण अंत

–या घटकांसाठी जुनेच दर.
प्रकार – शासकीय – खासगी
फ्रेश फ्रोझेन प्लाझ्मा – ३०० – ४००
–प्लेटलेट कॉन्सेंट्रेट – ३०० – ४००
क्र्योप्रेसीपीटेट – २०० – २५०

शासनाचे पत्र प्राप्त झाले, मात्र अद्याप नवे दर लागू केलेले नाहीत. लवकरच हे दर लागू करण्यात येणार आहेत. यापूर्वी झालेली दरवाढ जीएमसीने लागू केली नव्हती.

डॉ. दिलीप सराटे, विभाग प्रमुख, शासकीय रक्तपेढी, जीएमसी, अकोला.

भावी मुख्यमंत्रीचे पोस्टर कुणी लावले? सुप्रिया सुळेंचा संताप; मुंबई पोलिसांना केले आवाहन

स्वतःच्या रक्ताने लिहलेल्या पत्रातून मागणी

रक्त भाववाढीचा निर्णय तात्काळ मागे घ्या, ही मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे महासचिव उमेश इंगळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अकोला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्वतःच्या रक्ताने लिहिलेल्या निवेदन पत्रातून केली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईचा फटाका आता सामान्य रुग्णांना बसला आहे.

पतीच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी बाळाला जन्म, दिराने भावाच्या लेकराला आपलं मानलं, वहिनीशी लग्नगाठ बांधली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here