औरंगाबाद: दोन दिवसांपूर्वी पत्नीने शेतात विष प्राषण करत आत्महत्या केल्यानंतर पतीनेही शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील धावडा गावात समोर आली आहे. या दोघांच्या आत्महत्येने त्यांची चार मुलं पोरकी झाली आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुरेखा संतोष दळवी (वय -४१), संतोष किसन दळवी (वय -४५ रा.धावडा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) अशी या पती-पत्नीची नावं आहेत.

दळवी कुटुंबाची एकून तीन एकर शेती आहे. त्यांना दोन मुलं, दोन मुली अशी चार अपत्ये आहेत. २० फेब्रुवारी रोजी सकाळी सुरेखा यांनी विषारी औषधीचं सेवन केलं होतं. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, सुरेखा यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.

कॉलेजला जाण्यासाठी रेल्वे स्थानकात उतरली, एक चुकीचा निर्णय अन् सारी स्वप्न अधुरी ठेवून…
या घटनेला दोन दिवस उलटत नाही तर २२ फेब्रुवारी रोजी सकाळी पती संतोषने देखील शेतातील झाडाला गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली. संतोष गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच गावकऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून संतोषला मृत घोषित केले.

जोडपं भांडत होतं, अचानक बाल्कनीचा कठडा तुटला अन् दोघंही २५ फूट खाली कोसळले… खतरनाक व्हिडीओ
दोन दिवसात पती – पत्नी दोघांनी आत्महत्या का केली, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, कुटुंबाने बचत गट आणि खाजगी कर्ज घेतले असल्याचं सांगितलं जात आहेत. पती-पत्नी दोघांनी आत्महत्या केली, मात्र त्यांच्या पश्चात असलेल्या चार मुलांचे छत्र हरपले आहे. त्यांचे पुढील शिक्षण, पालन पोषण कोण करेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकप्रतीनिधी किंवा सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन या मुलांना मदत करावी अशी विनंती आता ग्रामस्थ करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here