बुलडाणा : एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यात घाटात एका एसटी बसचे ब्रेक निकामी झाले. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत ही बस दरीत न जाऊ देता डाव्या बाजूला असलेल्या डोंगरावर धडकवली. त्यामुळे बस उलटली. या अपघातात दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. या घटनेत चालकाने चाळीस प्रवाशांचे जीव वाचवले आहेत.

एसटी महामंडळाच्या भंगार बसेस रस्त्यावर धावत असल्याने सातत्याने एसटी बसेसचे अपघात होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बुलडाण्याहून जामनेर चाळीस प्रवाशांना घेऊन एसटी बस निघाली होती. ऐन घाटात या बसचे ब्रेक निकामी झाले. पण चालकाने प्रसंगावधान दाखवले आणि बस उलटली. यामुळे मोठा अपघात या ठिकाणी होता होता टळला आहे. ज्या ठिकाणी घाटात ही बस उलटली, तिथे बाजूलाच मोठी दरी आहे. या दरीत ही बस जाऊन कोसळली असती तर भीषण अपघात होऊन ४० प्रवाशांच्या जीव धोक्यात आले असते.

‘मी चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलो होतो. अचानक समोर एक छोटी गाडी आली. यावेळी चालकाने बसचा ब्रेक दाबला. पण ब्रेक लागला नाही. यामुळे चालकाने घाटात डोंगराच्या बाजूला बस वळवली. आणि बस डोंगरावर आदळली आणि उलटली. बस दरीत कोसळली असती तर एकही प्रवाशी वाचला नसता. चालक आणि वाहकही नाही’, अशी माहिती घटनेनंतर बसमधील प्रवाशाने दिली.
घरगुती कामानिमित्त तालुक्याला, वाटेतच मधमाश्यांचा हल्ला; दुचाकीस्वार शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
एसटीकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन एक आपुलकीचा असतो. आणि त्यातील सर्वसामान्यांची लालपरी ही अविरत न थकत धावत असते. पण तिची देखभालही मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे. पण नेमकं या लालपरीच्या मेंटेनन्सकडे दुर्लक्ष होत आहे. आणि हे दुर्लक्ष प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे ज्या शक्तीने लालपरी दिवस रात्र अविरत सर्वसामांन्यांकरिता धावते. तिला कुठेतरी दुर्लक्षित न करता तिची तांत्रिक देखभाल देखील होणे आवश्यक आहे. फक्त काही लहान-मोठे अपघात होता. तेव्हा या गोष्टी चर्चिल्या जातात. पण यावर कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे, असं सर्वसामांन्यातून सूर बाहेर येत आहे.

पिकाची राखण करायला शेतात गेला, मात्र मध्यरात्री घडलं असं काही की शेतकऱ्याने गमावला जीव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here