नवी दिल्ली : आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांनी यांना कथितरित्या खोट्या आणि बदनामीकारक पोस्ट शेअर केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. २४ तासांत लेखी माफी न मागितल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आयपीएस अधिकारी डी रूपा यांनी रोहिणी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं. आयपीएस डी रूपा यांनी फेसबुकवर आयएएस सिंधुरी यांचे काही खासगी फोटो पोस्ट केले होते. त्यावर रोहिणी सिंधुरी यांनी आक्षेप घेत बदनामीचा प्रयत्न असल्याचं म्हटलं होतं.आरोपांनंतर आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांनी त्यांचे वकील सीव्ही नागेश यांच्यामार्फत डी रूपा यांना नोटीस पाठवली आणि बिनशर्त माफीची मागणी केली. त्याचवेळी सिंधुरी यांनी नोटीसमध्ये एक कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानाची मागणी केली आहे. कर्नाटकमधील सनदी अधिकाऱ्यांमधील हा वाद समोर आल्यानंतर कर्नाटक सरकारनं मोठी कारवाई केली आहे. सकारने दोन्ही अधिकाऱ्यांची त्यांच्या सध्याच्या पदावरुन बदली केलीये. राज्य सरकारनं रुपा मोदगिल आणि रोहिणी सिंधुरी यांना कुठलाही पदभार दिलेला नाहीये. आयपीएस रुपा यांच्या आयएएस असलेल्या पतीची देखील बदली करण्यात आली आहे. रुपा मोदगिल आणि रोहिणी सिंधुरी यांची राज्याच्या मुख्यालयात कोणत्याही पदभाराशिवाय पुढील नियुक्तीपर्यंत पोस्टिंग करण्यात आलेली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी याची दखल घेतली होती. कर्नाटकच्या प्रशासनात जे सुरु आहे ते दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले.रोहिणी सिंधुरी यांचे पती सुधीर रेड्डी यांनी या प्रकरण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हॅकिंग आणि पत्नीच्या छायाचित्राचा गैरवापर करण्यात आल्याचं त्यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. तर यांनी कर्नाटकच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. कोण आहेत रोहिणी सिंधुरी?रोहिणी सिंधुरी २००९ च्या कर्नाटक केडरच्या अधिकारी रोहिणी सिंधुरी मुळच्या आंध्रप्रदेशच्या आहेत. मांड्या जिल्ह्यात जिल्हा परिषद सीइओ म्हणून त्यांचं उल्लेखनीय कामपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता.