लखनऊ: उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये प्रेयसीने तिच्या कुटुंबीयांसह मिळून प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर त्यांनी या तरुणाचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. प्रेयसी ही विवाहित असल्याची माहिती आहे. तिने तिच्या पतीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला, तेव्हा प्रियकर संतापला. तो थेट प्रेयसीला भेटायला तिच्या घरी पोहोचला. तिथेच त्याची हत्या करण्यात आली.

रायबरेली येथील हैदरगढ येथील रहिवासी भगवान दास उर्फ बबलू यादव याचे महाराजगंज पोलीस स्टेशन परिसरातील पूनम नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध होते. पूनमही विवाहित होती. मिळालेल्या माहितीनुसार भगवान दास याने गर्लफ्रेंड पूनमवर लाखो रुपये खर्च केले होते. इतकंच नाही तर पूनमच्या प्रसूतीवेळीही भगवान दास याने तिच्यावर तीन लाख रुपये खर्च केले होते, असं सांगितलं जात आहे.

लग्नावरुन परतत होते, घरापासून १ किमी अंतरावर मृत्यूने गाठलं, तीन भावंडांनी एकत्र जग सोडलं
दरम्यान, पूनमने तिच्या पतीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हे पाहून भगवान दास याच्या पायातील आग मस्तकात गेली आणि तो रागाच्या भरात थेट पूनमच्या घरी पोहोचला. तिथे दोघांमध्ये खूप वाद झाला. यानंतर पूनमने तिच्या कुटुंबीयांसह मिळून भगवान दास याची हत्या केली. खून केल्यानंतर त्यांनी मृतदेह कालव्यात फेकून दिला.

बऱ्याच वेळापासून भगवान दास याचा चार-पाच दिवस काही पत्ता लागत नव्हता. म्हणून त्याच्या नातेवाइकांनी गोमती नगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला. पोलिसांनी त्याचं मोबाईल लोकेशन ट्रॅक केलं असता ते महाराजगंज येथील केडवा या गावातील दाखवत होते. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास केला.

आई पाठोपाठ बाबाही गेले, दोन दिवसांत चार पोरं अनाथ, औरंगाबादेत हळहळ
महाराजगंज पोलिसांनी गावात जाऊन माहिती घेतली असता त्यांना कळालं की भगवान दासच्या घरासमोर राहणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत त्याचे विवाहबाह्य संबंध होते. तेव्हा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि त्या महिलेची तसेच तिच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली. तेव्हा त्यांनी भगवानदासची हत्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here