aaditya thackeray criticized shinde faction, हा सिंघमचा पंजा आहे; कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आदित्य ठाकरेंचा भाजप, शिंदे गटावर हल्लाबोल – aaditya thackeray criticized on bjp and shinde faction of shiv sena in election rally of kasba bypoll election
पुणे : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी कसबा पेठ मतदारसंघात जाहीर सभा घेतली. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. सध्याची राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. अंत्यत गलिच्छ राजकारण सुरू आहे. त्यामुळे संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही लढत आहोत. त्यामुळे ही फक्त निवडणूक नसून ही लोकशाही आणि संविधान रक्षणाची लढाई आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले, हा उत्साह बघितल्यानंतर ही प्रचारसभा नसून विजयसभा असल्याचे वाटत आहे. आता निवडणूक ही फक्त औपचारिकता आहे. विजय आपलाच आहे. प्रचारसभेसाठी येताना विजयसभेसाठी आल्याचे वाटत आहे. हा रोड शो होत असताना ५० खोके, एकदम ओके अशा घोषणा येत होत्या. निवडणूक चिन्ह काँग्रेसचा पंजा म्हणजे सिंघमचा पंजा आहे. रवींद्र धंगेकर यांना विधानसभेत आणायचे आहे, आता तुम्ही तुमचे काम करा, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी मतदारांना केलं. चिंताजनक! LIC चे ३०,००० कोटी रुपये धोक्यात! अदानी समूहात किती गुंतवणूक शिल्लक आहे हे जाणून घ्या आदित्य ठाकरे म्हणाले, ‘३२ वर्षांचा तरुण गद्दारांशी एकटा लढत आहे, असे तुम्ही म्हणता पण माझ्या पाठिशी जनता आहे. अत्यंत गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे. आपल्या पक्षाचे नाव चोरले, पक्षाचे नाव चोरले, पण तुमच्या माथ्यावर गद्दार असा शिक्का आहे. ४० गद्दारांनी शिवसेना, महाविकास आघाडी आणि जनतेशी गद्दारी केली आहे. ते चोर आहेत, आणि चोर असाच त्यांचा उल्लेख होणार, ते गद्दार आहेत.’
रात्री गोठ्यात गुरं बांधली, शेतकरी घरी गेला, त्यानंतर जे घडलं ते पाहून शेतकऱ्याचं अवसानच गळलं महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे आणि जगाचेही लक्ष या निवडणुकीकडे आहे. देशाला दिशा देणारी ही निवडणूक आहे. विरोधकच नाही तर सामान्य माणासांनाही नोटीस पाठवत आहे. भाजपविरोधात बोलल्यावर विविध यंत्रणा नोटीस पाठवतात. त्यानंतर चोकशीचा ससेमिरा मागे लागतो. हे सर्व हूकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे. हे वातावरण भयानक आहे. आमच्या विरोधात बोलतात, तर आत टाकू ही दहशत निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे ही फक्त निवडणूक राहिली नसून देशाला दिशा देणारी घटना ठरली आहे, असे ठाकरे पुढे म्हणाले.