ते नेहमीप्रमाणे लॉटरी खरेदीसाठी घराबाहेर पडले. त्यांनी मिनी मार्टमधून ५ कॅनेडियन डॉलर्सचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले आणि नेहमीप्रमाणे आपल्या खिशात ठेवले. त्यानंतर ते घरी जातात आणि ते तिकीट स्क्रॅच करतात. त्यांना अखेर लॉटरी लागली. जेव्हा त्यांनी हे पाहिलं तेव्हा त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही.
mirror.co.uk या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार ड्रेसडेन यांनी जेव्हा ते तिकीट स्क्रॅच केले तेव्हा त्यावर पहिले ३२ क्रमांक होता. ते पाहून त्यांच्या अपेक्षा वाढल्या, त्यांना वाटलं की त्यांना लॉटरी लागू शकते, म्हणून त्यांनी तिकीट आणखी स्क्रॅच केले. ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. जेव्हा त्यांनी तो नंबर इन्स्टंट बिंगो लॉटरीच्या सर्वोच्च बक्षीसाशी जुळवला तेव्हा त्याला आढळले की त्यांनी एक लाख डॉलर्स जिंकले आहेत. भारतीय चलनानुसार या व्यक्तीने सुमारे ८२ लाख ६४ हजार ७५५ रुपये जिंकले आहेत.
या विजयाने त्यांना रात्रभर झोपच लागली नाही. त्यांना विश्वासच होईना की त्यांना लॉटरी लागली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी दुकानात जाऊन पुन्हा तिकीट तपासले तेव्हा त्यांना खात्री पटली. त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. ड्रेसडेन म्हणतात की, वाढदिवसाला मिळालेली ही सर्वोत्तम भेट आहे. या पैशांतून ते त्यांच्या घराची दुरुस्ती करणार आहेत. तसेच, स्वतःसाठी एक आयफोन देखील खरेदी करणार आहे. त्याशिवाय ते त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी काही पैसे ठेवतील.