रत्नागिरी: खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेले आरोपांचा समाचार रामदास कदम यांनी घेतला आहे. संजय राऊत यांच्या विरोधात रामदास कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘सामना’चे सहसंपादक चिंदरकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे की, मी संजय राऊत यांना तुमच्यावरती शाईफेक होईल म्हणून सांभाळून राहा असे सांगितले होते. संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी मला मारण्याची सुपारी दिली, असा गंभीर आरोप केला. हे संजय राऊत यांचे षडयंत्र आहे, असा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी खेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी कदमांनी संजय राऊत यांच्यावर बरीच आगपाखड केली.संजय राऊत आता तुम्ही थांबा आता मला जास्त बोलायला लावू नका. मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. संजय राऊत यांना मी आता एवढेच सांगेन की, मी काही गोष्टी अजूनही विसरलेलो नाही. तुम्ही उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्याबद्दल काय अश्लील शिवीगाळ केली होती, याची आठवण मला आहे, असेही रामदास कदम यांनी म्हटले.

ज्या वेळेला सामनाच्या कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी रश्मी वहिनींना दिली, त्यावेळेला तुम्ही उद्धव ठाकरे व रश्मी वहिनी यांच्याबद्दल अश्लील भाषा वापरली होती. हे मी विसरलेलो नाही. संजय राऊत आमदारांचे भाव तुम्हीच ठरवताय तुम्हीच बोलताय. हे थांबवा मला तोंड जास्त उघडायला लावू नका, असा इशारा रामदास कदम यांनी दिला. मी इतके दिवस गप्प होतो पण आता डोक्यावरून पाणी जाऊ लागले आहे. त्यामुळे आता आपण थांबणार नाही. संजय राऊत यांनी आता ‘बाप दाखवावा नाहीतर श्राद्ध घालावे’, असा इशारा रामदास कदम यांनी दिला.
…तर उद्धव आणि रश्मी ठाकरे हे संजय राऊतांना चप्पलेने मारतील; नारायण राणेंचा खळबळजनक दावा
संजय राऊत हे उसने अवसान आणून शिवसेना वाचवतो आहोत, असा अविर्भाव आणत आहेत. पण तुमच्या निष्ठेच्या विष्ठा कधीच झाल्या आहेत. तुम्ही सबंध देशाला व महाराष्ट्राला फसवत आहात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की बाटगा अधिक कडवा असतो तोच कडवेपणा तुम्ही दाखवत आहात. संजय राऊत कुणाकडून सुपारी घेऊन बोलत आहेत, हे मी सगळच बोलणार आहे पण अजून थोडे दिवस मी थांबतोय, असे रामदास कदम यांनी म्हटले.

१९ मार्चच्या सभेत सर्व प्रश्नांची उत्तरं देईन: रामदास कदम

खेड येथे उद्धव ठाकरे यांची ५ मार्चला सभा होणार आहे. त्यांच्या या सभेचा स्थानिक राजकारणावर तसूभरही परिणाम होणार नाही. शिमगा झाल्यानंतर १९ मार्चला याच ठिकाणी मी सभा घेईन. त्यावेळी मी सर्व प्रश्नांची उत्तरं देईन, असे रामदास कदम यांनी म्हटले. अनंत गीते यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, अनंत गीते याना लोकसभा निवडणुकीत फक्त दापोली विधानसभा मतदारसंघातच मताधिक्य होते.
रश्मी ठाकरे संजय राऊतांच्या घरी, टेंभी नाका देवीच्या दर्शनाहून परतताना राऊत कुटुंबाची भेट
शिवसेनाप्रमुख गेल्यानंतर दादागिरी तुम्हीच केलीत. तुम्हीच हुकुमशहा झालात मला व माझ्या मुलाला आमदार योगेश याला संपवायचा प्रयत्न केलात. आपल्याच पक्षाचा असलेल्या आमदाराला आपणच कसे संपवता? कोणता पक्षप्रमुख असा वागतो, असा सवाल कदम यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. उद्धव ठाकरे यांना आमदार योगेश कदम व रामदास कदम यांच्यासाठी खेडमध्ये यावे लागत आहे. येथेच आमचा विजय आहे, असाही टोला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here