मुंबई: लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करणारा अभिनेता याच्या कामाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी कौतुक केलं आहे. मात्र, सोनू सूद करत असलेल्या कामाचा आवाका आणि त्याची क्षमता याबाबत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘सोनू सूदला कोणाचं आर्थिक पाठबळ आहे ते भविष्यात कळेलच,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ( on )

लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी सोनू सूदनं मोफत बसगाड्यांची व्यवस्था केली. रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली. स्थलांतरितांसाठी देवदूत ठरलेल्या सोनूच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्याच्याबद्दल लेख लिहिल्यानंतर त्याचं भाजपशी कनेक्शन असल्याची चर्चा होऊ लागली. त्यावरून बरीच चर्चा झाली. मात्र, सोनू सूदनं काम सुरूच ठेवलं. आताही तो कोकणातील गणेशभक्तांसाठी गाड्यांची व्यवस्था करत आहे. याबद्दल राज ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी सोनूच्या आर्थिक क्षमतेबद्दल शंका उपस्थित केली. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

‘सोनू सूद चांगलं काम करतोय त्याबाबत दुमत नाही. इतरांसाठी काम करण्याची सगळ्यांची इच्छा असते, पण आर्थिक परिस्थितीमुळे ते करता येत नाही. सोनू सूद जे काम करतोय ते त्याचं एकट्याचं डोकं आहे असं मला वाटत नाही. त्याला कोणीतरी आर्थिक मदत करत असावं. तो काही काही एवढा मोठा कलाकार नाही किंवा श्रीमंत नाही. तो चांगला अभिनेता असेलही, पण त्याची आर्थिक बाजू इतकी भक्कम नाही. तरीही तो मदत करतोय. त्याची आर्थिक स्थिती काय आहे? त्यामागे कोण आहे?, हे एकदा तपासलं पाहिजे,’ असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

मनोरंजन क्षेत्राला मोकळीक द्यायला हवी!

लॉकडाऊनमधून मनोरंजन क्षेत्राला आता मोकळीक द्यायला हवी. तिथे उगाच काही वाकडेतिकडे नियम लावता कामा नये. आज जगातील अनेक देशांत सगळं काही सुरळीत झालं आहे. पुरेशी काळजी घ्यायला पाहिजे पण आता बंद ठेवणं हा मार्ग नाही,’ असंही ते म्हणाले.

हेही वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here