दिनेश प्रभाकरराव तायडे (वय ३२ वर्ष) व प्रभाकर उत्तमराव तायडे (वय ५७ वर्ष) दोघेही रा. भिलटेक ह. मु. बोरगाव मेघे, वर्धा) असे मृतक पिता पुत्राची नावं आहेत. प्रभाकर तायडे व त्यांचे पुत्र दिनेश हे दोघे कामासाठी मागील काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यातील बोरगाव मेघे येथे वास्तव्याला आहेत.
दरम्यान, गुरूवार ते दुचाकीने बोरगाव मेघे वरुन भिल टेक येथे येत होते. तळेगाव दशासर ते चांदूर रेल्वे मार्गावरील राजनाथ फाटकाजवळ तायडे यांच्या दुचाकीची विरुद्ध दिशेने येणाऱ्या झालो कारसोबत धडक झाली. या अपघातात जबर दुखापत झाल्यामुळे तायडे पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती चांदूर रेल्वेचे पोलिस निरीक्षक सुनील सोळंके यांनी दिली. कोल्हा आडवा आल्यामुळे बाईक आणि कारचा अपघात झाल्याचं वृत्त आहे.
अपघाताची माहिती मिळताच चांदूर रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले होते. एकाचवेळी अपघातात तरुण मुलाचा व त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती भिलटेक व बोरगाव गावात पोहोचताच गावकऱ्यांनी दुःख व्यक्त केले.
राळेगणसिद्धी गहिवरले! शहीद कॅप्टन सौरभ औटी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार