दरम्यान त्यांच्या लग्नाला आई-वडिलांचा प्रचंड विरोध होता. काही दिवसांपूर्वी विकास इंगळे हा सुटीवर आला, म्हणजेच विकास हा पत्नी व मुलास सासरे सदाशिव भालेराव यांच्याकडे आला. जावई विकास इंगळे याने त्याचा फ्लॅट आईच्या नावाने केला असल्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. माझ्या नावावर न करता फ्लॅट तुम्ही तुमच्या आईच्या नावावर का केला? असे अनेक प्रश्न विकासच्या पत्नीकडून उपस्थित व्हायला लागले. त्यातून वाद होऊ लागले. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास दोघेही पती-पत्नी व मुलगा दुचाकीने गोंधापूरला जाण्यासाठी निघाले.
विकास इंगळे याने सासूला फोन करून खरप नाल्याजवळ तुमच्या मुलीच्या गळ्यातील चेन कुणीतरी अज्ञात चोरट्याने तोडल्यामुळे तिचा गळा चिरला आहे. तिला शासकीय रुग्णालयात घेऊन जात आहे. याठिकाणी गेल्यावर मुलीने कोणी चोरट्याने चेन चोरली नसून, पतीने म्हणजे विकास इंगळे याने चाकूने गळा चिरल्याचे सांगून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. याप्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी विकास इंगळे याच्याविरुद्ध ३०७ नुसार गुन्हा दाखल केला.
सासऱ्यावरही चाकूने हल्ल्याचा प्रयत्न
शासकीय रुग्णालयात जखमी मुलीला भेटण्यासाठी पोहोचल्यावर सासरे सदाशिव भालेराव यांनी जावई विकास इंगळेला या संदर्भात जाब विचारला असता, त्यानंतर विकासने चाकूने सदाशिव भालेराव यांच्यावरही हल्ला केला. परंतु त्याला विरोध केल्यामुळे भालेराव यांच्या हाताला व बोटांना जखम झालीय. दरम्यान दोघे पती-पत्नीमध्ये सतत किरकोळ कारणांवरुन वाद व्हायचा, तसेच अनेक प्रकरणात अगोदरही बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.