Harmanpreet kaur crying video Anjum chopra, VIDEO:अंजुम चोप्राला भेटून ढसाढसा रडली हरमनप्रीत कौर, पराभवाने हिरमुसली टीम इंडियाची कॅप्टन – harmanpreet kaur crying after meeting ex captain anjum chopra video viral after ind2 vs ausw semifinal in womens t20wc 2023
केपटाऊन:भारताच्या महिला क्रिकेट संघाचे विश्वचषकाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. भारताला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. या सामन्यापूर्वीच टीम इंडियावर संकट आलं होतं ते म्हणजे भारताच्या दोन खेळाडू आजारी पडल्या होत्या. पूजा वस्त्राकर आजारपणामुळे संघाबाहेर झाली, त्यामुळे कमी अधिक प्रमाणात संघाचे नियोजन बिघडले. तर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरही आजारी होती. पण आजारी असतानाही तिने भारतासाठी झुंजार खेळी केली. पण त्यात तिला अपयश आले. माजी कर्णधार अंजुम चोप्राला मिठी मारून हरमन रडताना दिसली.
या क्षणाचा व्हिडिओ आयसीसीने आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ती आपली सिनियर पार्टनर आणि टूर्नामेंटमध्ये हिंदी कॉमेंट्री करत असलेल्या अंजुम चोप्राला मिठी मारून रडत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे अंजुमचीही अशीच परिस्थिती होती. जेव्हा टीम इंडिया हरली तेव्हा ती इतकी भावूक झाली होती की तिच्या तोंडून शब्दच निघत नव्हते. IndW vs AusW: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या षटकांची कहाणी, असं काय घडलं की टीम इंडियाने सामना गमावला अंजुम चोप्रालाही बोलताना बरेचदा आपले अश्रू आवारत होत्या. हरमनबद्दल विचारले असता तिने सांगितले की, तिला हरमनला एक भावनिक आधार द्यायचा होता. हरमनची तब्येत बिघडली होती. असे असतानाही ती मैदानात उतरली. दुसरा सामना असता तर कदाचित ती खेळली नसती. पण ती उपांत्य फेरी होती. यातून ती मागे हटू शकली नाही.
त्या पुढे म्हणाल्या – तिने फलंदाजी करताना टीम इंडियासाठी विजयाची एक आशा निर्माण केली. जेमिमाने तिला खूप साथ दिली. भारत ज्या प्रकारे हरला, त्यामध्ये ५ धावा जास्तही असतात आणि ५ धावा कमीही असतात. त्यामुळे हरमनप्रीतच्या मनात नेमकं काय चालूअसेल , याचा अंदाज मला आहे.’