अहमदनगर : रात्रीच्या अंधारात अडोशाला दारू पित बसणे दोघांना चांगलेच महागात पडले. लुटारूंनी त्यांच्यावर हल्ला केला. लुटारूंच्या गोळीबारात एक जण ठार झाला. नगर शहराजवळील केडगाव बायपासवर गुरुवारी रात्री ही घटना घडली. ‘आम्ही येथे बसून दारु पिऊ का?’ असं विचारत दोघा आरोपींनी गप्पांना सुरुवात केली. त्यानंतर आणखी एकाच्या साथीने येत दोघांना लुटण्याचा प्रयत्न केला.

शिवाजी किसन ऊर्फ देवा होले (रा. कल्याण रोड, नगर) हा गोळीबारात ठार झाला आहे. त्याचा साथीदार अरुण नाथा शिंदे (वय ४५ वर्ष) याच्या गळ्याला चाकू लावून लुटारूंनी तीन हजार रुपये जबदस्तीने चोरून नेले. तिघे लुटारू अंधारात पळून गेले.

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिवाजी होले व अरुण नाथा शिंदे हे दोघे केडगाव बायपास रोडवर एका बंद ढाब्याजवळ अंधारात दारु पित बसले होते. त्यावेळी बायपासने दोघे पायी चालत त्यांच्याजवळ आले. त्यांना म्हणाले की, ‘आम्ही येथे बसून दारु पिऊ का?’ त्याला या दोघांनी होकार दिला.

‘आम्ही दोघे नेप्ती गावाचेच आहोत. तुम्ही बिनधास्त येथे बसून दारु प्या.’ असेही शिंदे यांनी त्या दोघांना सांगितले. त्यावर ते दोघे काहीही न बोलता तेथून निघून गेले. थोड्याच वेळात ते परत आले. तेव्हा त्यांच्यासोबत आणखी एक जण होता. एकाच्या हातात चाकू व दुसऱ्याच्या हातात पिस्तूल होता.

चार घास खायला दाम्पत्य शेतात निघालं, विवाहिता पाणी काढायला विहिरीवर, अन् तिथेच आक्रित घडलं
जवळ येताच त्यांनी शिंदे याच्या गळ्याला चाकू लावला. तुमच्याकडे असतील ते पैसे काढून द्या, अशी धमकी दिली. त्यावेळी शिंदे यांच्यासोबत असलेले होले यांनी लुटारूंना विरोध करीत रस्त्याकडे पळ काढला. त्यावेळी पिस्तूलधारी व्यक्तीने होले यांच्यावर गोळी झाडली. ती लागून होले याचा मृत्यू झाला.
मनोजकाकाने अत्याचार केला, मुलीचा दावा; आरोपी म्हणतो मग २ महिन्यांनी माझ्या लग्नाला का आलीस?
लुटारूंनी शिंदे यांच्या मानेला चाकू लावत तीन हजार रुपये व मोबाईल काढून घेता. त्यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर फेकून तिघे लुटारू तेथून निघून गेले. कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदेंकडे शिवसेना येताच माजी आमदाराची उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here