दरम्यान, व्यावसायिकाचे वय झाल्याने त्यांना याबाबत काहीच आठवत नाहीये. त्यांनी कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या विमा काढला नाहीये, असा दावा त्यांच्या मुलीने केला आहे. याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी त्या कंपनीला पत्र लिहलं आहे. तसंच, तक्रारदाराने RTGSद्वारे २० खात्यांमध्ये पैसे पाठवले होते. ती सर्व खाती गोठवण्यासाठी बँकानाही पत्र पाठवण्यात आले आहे. शिवाय, ज्या नंबरवरुन व्यावसायिकाला फोन आले त्याचा व बँक खात्यात पैसे जमा झाले त्या खातेदारांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
जुलै २०१७मध्ये त्यांना पहिल्यांदा कॉल आला होता. त्यावेळी कॉलवरील व्यक्तीने विमा कंपनीचा अधिकारी म्हणून ओळख करुन दिली होती. त्याने व्यावसायिकाला त्यांच्या दोन पॉलिसी मॅच्युअर झाल्या असून त्याचे १४ कोटी रुपये मिळणार असल्याचं सांगितलं. फक्त ती रक्कम मिळवण्यासाठी त्यांना दोन कोटींचे शुल्क भरावे लागेल कारण त्यांच्या पॉलिसी आता सक्रीय नाहीयेत, अशी बतावणी केली.
व्यावसायिकाने अधिकाऱ्याने सांगितलेल्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर काही दिवसांत एका दुसऱ्या व्यक्तीचा फोन आला व त्याने काही अतिरिक्त शुल्क भरण्यास सांगितले. इतकंच नव्हे तर, पाच सहा महिन्यांनी दुसर्या एका व्यक्तीचा फोन आला आणि त्याने सांगितले की, त्याचा सहकारी मरण पावला असून आता तुमच्या पॉलिसीची केस माझ्याकडे आहे. तसंच, पॉलिसीचे पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्याने व्यावसायिकाच्या बँकेचे तपशील घेतले.
तक्रारदाराने पैसे पाठवल्यानंतर आरोपीने त्यांना २ कोटी रुपयांच्या चेकचे फोटोही पाठवले होते आणि तुमची पॉलिसी सक्रीय असून त्याचा परतावा तुम्हाला मिळेल, असं म्हणत अश्वस्तदेखील केले होते. पीडितेने गेल्या दोन महिन्यात आरोपींना ६० लाख रुपये दिले होते, असं पोलिस तपासात समोर आलं आहे.
२० फेब्रुवारी रोजी, गुन्हे शाखेच्या पश्चिम विभागीय सायबर पोलिस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला. आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीपी सायबर बलसिंग राजपूत आणि अधिकारी महेंद्र जाधव, मौसमी पाटील आणि विजय घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केला.
I saw your article well. You seem to enjoy casinocommunity for some reason. We can help you enjoy more fun. Welcome anytime 🙂
bb