अमरावती : रस्त्यावरून पायी चालणाऱ्या महिलांची सोनसाखळी चोरून नेल्याच्या घटना आपण सर्वांनी ऐकल्या असतील, मात्र अमरावतीत एक अनोखी घटना समोर आली आहे. चोरट्याने थेट बूट घालून महिलेच्या घरात शिरत तिला धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर तिच्या गळ्यातली चेन ओढून तो पसार झाला. ही धक्कादायक घटना अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस ठाण्यात हद्दीत घडल्याचं समोर आलं आहे.

भरदिवसा एका महिलेच्या घरात शिरून तिच्या गळ्यातील २० हजारांचे मंगळसूत्र हिसकाविण्यात आले. ही घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी लुटारूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत राहणारी महिला आपल्या चिमुकल्या नातीसह घरी होती. दुपारी ३ वाजताच्या सुमारास तोंडाला दुपट्टा बांधून असलेला एक लुटारू अचानक बूट घालून त्यांच्या घरातील स्वयंपाक गृहात शिरला. त्यामुळे महिलेने त्याला बुट घालून घरात कसा काय आला, अशी विचारणा केली.

मनोजकाकाने अत्याचार केला, मुलीचा दावा; आरोपी म्हणतो मग २ महिन्यांनी माझ्या लग्नाला का आलीस?
त्यावर लुटारूने त्यांना धक्का देऊन खाली पाडले. त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून तो पळून गेला. महिलेने आरडाओरड करीत त्याचा पाठलाग केला. मात्र, तो दुचाकीने तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी महिलेने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अज्ञात लुटारूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा कसून शोध सुरू आहे.

आधी म्हणाले, सोबत दारू पिऊ, नंतर गोळ्या घालून केला खून, नगरमध्ये भररस्त्यात थरार
रस्त्यावरून अशाप्रकारे चेन चोरण्याच्या घटना नवीन नव्हत्या मात्र दुपारी घरातील पुरुष मंडळी कामानिमित्त बाहेर जातात अशातच महिला घरात असताना अशा प्रकारची धक्कादायक घटना घडल्याने अमरावती शहरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सार्वजनिक शौचालयात थाटला सैराट बार; बार व्यवसायिकाचा कारनामा, नवी मुंबईतला धक्कादायक प्रकार

1 COMMENT

  1. It’s really great. Thank you for providing a quality article. There is something you might be interested in. Do you know slotsite ? If you have more questions, please come to my site and check it out!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here