सोशल स्टॉक एक्स्चेंजचे उद्देश काय?
एनएसईचे सोशल स्टॉक एक्सचेंज सुरु करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजाच्या भल्यासाठी काम करणारे ट्रस्ट आणि चॅरिटेबल संस्थांना (NPOs) शेअर बाजारातून निधी उभारण्यास मदत करण्याचा आहे. भारतापूर्वी सोशल स्टॉक एक्सचेंज आधीच इंग्लंड, कॅनडा आणि ब्राझील सारख्या देशांमध्ये कार्यरत आहे. SSE वर फक्त सोशल एंटरप्रायझेसचे (NPOs आणि चॅरिटेबल ट्रस्ट) शेअर्सचे व्यवहार केले जातील.
गेल्या वर्षी बाजार नियामकने सोशल स्टॉक एक्स्चेंजबाबत फ्रेमवर्क जारी केला होता. आणि निधी उभारण्यासाठी या संस्था आता सार्वजनिक ऑफरद्वारे झिरो कूपन-झिरो प्रिन्सिपल बॉण्ड्स (ZCZP) जारी करू शकतात किंवा खाजगी प्लेसमेंटद्वारे शेअर्स जारी करून पैसे उभे करू शकतात.
सोशल स्टॉक एक्सचेंज कसं काम करते?
सोशल स्टॉक एक्सचेंज नावावरून स्पष्ट होते की स्टॉक एक्सचेंजसारखे काम करते. शेअर बाजाराबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे की हे कंपन्या आणि कॉर्पोरेशन्ससाठी खुल्या बाजारात सामान्य लोक आणि गुंतवणूकदारांकडून निधी उभारण्याचे एक व्यासपीठ आहे. ज्याप्रमाणे कंपन्यांचे शेअर्स किंवा बॉण्ड्स मार्केटमध्ये सूचीबाद होतात त्याचप्रमाणे सोशल स्टॉक एक्स्चेंज खासगी संस्था आणि नफ्याच्या उद्देशाने काम न करणाऱ्या संस्थांना म्हणजेच स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) शेअर बाजारात सूचीबद्धची सुविधा देते. याद्वारे स्वयंसेवी संस्थांना पैसा उभारण्याचा पर्यायी माध्यम मिळतो.
सोशल स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग प्रक्रिया
सोशल स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होण्यासाठी संस्थांना प्रथम त्याच्या विभागात नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर, त्यांची यादी केली जाईल. सूचीबद्ध झाल्यानंतर सामाजिक उपक्रम सार्वजनिक इश्यू किंवा प्रायव्हेट प्लेसमेंटद्वारे शून्य कूपन झिरो प्रिन्सिपल सारखी उपकरणे लॉन्च करू शकतात आणि त्यांच्या स्वत:च्या वापरासाठी लोकांकडून निधी गोळा करू शकतात. सध्याच्या कायद्यानुसार झिरो कूपन झिरो प्रिन्सिपलचा (ZCZP) आकार किमान रु. १ कोटी आणि सबस्क्रिप्शनसाठी अर्जाचा किमान आकार रु. २ लाख असावा.