उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे व जळगावचा पश्चिम भाग या ठिकाणी पपईची लागवड केली जाते. जळगाव जिल्ह्यात तुरळक अशा ठिकाणी पपईची लागवड होते. गेल्या दोन वर्षात व्यापाऱ्यांकडून भाव कमी मिळत असल्याने शेतकरी केळी, ऊस व मिरचीकडे वळले. त्या तुलनेत यंदा पपईची लागवडीचे क्षेत्र घटले, पपईची लागवड कमी प्रमाणात झाली. यातच पपईचे उत्पादन घेणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात पश्चिम भागात अतिपावसामुळे पपईचे नुकसान झाले होते. पावसामुळे फुलाचे रुपांतर हे फळात झाले नव्हते, तर दुसरीकडे पाऊस कमी झाल्यामुळे तर पपईसाठी आवश्यक थंडी चांगल्या प्रमाणात असल्याने चांगल्या प्रमाणात पपईचे उत्पादन झाले.
जळगाव जिल्ह्यात केळीनंतर पर्याय म्हणून पपईकडे बघितले जाते. उत्तर महाराष्ट्रात यंदा थंडी चांगली होती, थंडीत साधारत: नागरिकांचा कल गरम असलेली फळे खाण्याकडे कल असतो. त्यामुळे पपईला मागणी वाढली, मात्र त्याप्रमाणात माल नसल्याने पपईला यंदा चांगला भाव मिळत आहे. गेल्या आठ ते दहा वर्षापूर्वीची स्थिती बघितली तर पपईला ६ ते ७ रुपये किलो असा भाव मिळाला होता, मात्र यंदा तिप्पट म्हणजे शेतकऱ्याला जागेवरच १८ ते २० रुपये भाव मिळत आहे. म्हणजचे एका क्विंटलला १८०० ते २००० रुपये किलो एवढा भाव शेतकऱ्याला मिळत आहे. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच फेब्रवारी महिन्यातच अशा पध्दतीने पपईला विक्रमी असा भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे हे पपईचे मार्केटचे दर हे २५ ते २७ रुपये किलो असून किरकोळ बाजारात पपई ही ३० ते ४० रुपये दराने विक्री केली जात असल्याचे प्रगतीशिल शेतकरी भगवान निंबा पाटील हे सांगतात.
काश्मीर, बिहार, मुंबई, तसेच दिल्ली या प्रमाणे पपईला संपूर्ण देशात मागणी असते. उत्तर महाराष्ट्रातील ७५ टक्के पपईचा माल हा दिल्ली येथे जातो याठिकाणाहून ही देशात इतरत्र एक्स्पोर्ट केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. लागवड कमी व मालाची मागणी वाढल्याने हेच पपईला विक्रमी भाव मिळण्यामागचे प्रमुख कारण असल्याचे शेतकरी सांगतात. यंदा विक्रमी भावामुळे एका एकरात शेतकऱ्याला पपईचे लाखोचे उत्पन्न झाल असून शेतकरी मालामाल झाल्याचे पहायला मिळत आहे.
१० पोती कांद्यांच्या बदल्यात फक्त २ रुपयांचा चेक; शेतकऱ्यासोबत घडलं विचित्र