भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी….
सध्या या सिस्टमला हावडासह आणखी ३-४ डिव्हिजनमध्ये विकासित करण्याचं काम सुरू आहे. या सिस्टमच्या माध्यमातून प्रवाशांचा माल आणि पार्सल याला एक लॉक बसवण्यात येईल. जे उघडण्यासाठी ओटोपीची आवश्यकता असेल, असे याचे उद्देश आहे. रेल्वेच्या या नव्या निर्णयामुळे फक्त प्रवाशांनाच दिलासा मिळणार नाही तर यामुळे रेल्वेमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटना थांबवण्यासाठी मोठी मदत होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालवाहतुकीतून मिळणारा महसूलही यामुळे वाढेल.
अधिक माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच २५ जानेवारी २०२३ पर्यंत रेल्वेच्या सुरक्षा दलाने रेल्वेतून चोरी होणारी एकूण २५ लाखांची संपत्ती जप्त केली आहे. इतकंच नाहीतर या कारवाईमध्ये आतापर्यंत तब्बल ११,२६८ चोरट्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
कशा पद्धतीने काम करेल हे नवीन सिस्टम….
रेल्वेद्वारा विकसित करण्यात येणारे डिजिटल लॉक सिस्टम हे ओटीपीच्या माध्यमातून उघडले आणि बंद केले जाईल. हा ओटीपी संबंधित रेल्वे कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर पाठवला जाईल. जेव्हा रेल्वे स्थानकावर थांबेल तेव्हा पायलटला लॉकचं बटण दाबावं लागेल. यानंतर रेल्वे अधिकारी ओटीपीने व्हेरिफिकेशन करतील आणि यानंतर लॉक उघडले जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर या डिजिटल लॉकसोबत कोणी छेडछाड केली किंवा दरवाजा आपण्याचाही जरी आवाज झाला तर यासंबंधी तातडीने अधिकाऱ्यांना मोबाईलवर माहिती मिळेल. या डिजिटल लॉक सिस्टमद्वारे ट्रेनला ट्रॅकही करता येईल आणि रेल्वेचे लाईव्ह लोकेशनही मिळवता येईल, अशी माहिती भारतीय रेल्वेकडून देण्यात आली आहे.