कोण आहेत नोरिएल रुबिनी?
उल्लेखनीय आहे की नोरिएल रुबिनी यांनी यापूर्वी २००८ मध्ये जगिक आर्थिक मंदीचा अचूक अंदाज वर्तवला होता. या मंदीनंतर जगभरातील शेअर बाजार कोसळले यात मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांचे नुकसान झाले. तेव्हापासून नुरिएल रुबिनीला “डॉ. डूम” म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली.
जगभरात भारताचा डंका वाजणार
रुबिनी यांनी म्हटले की भारत एक मोठा देश आहे आणि देशातील बहुतांश लोकसंख्या तरुण आहे. उत्तम शिक्षण आणि कौशल्य असलेले येथील तरुण भारताला एका मजबूत विकासाकडे नेऊ शकतात. अलीकडच्या काळात भारताची आर्थिक वाढ झपाट्याने झाली असून ते देखील अनुभवता येते. आणि आता विकासाचा वेग वाढणार असे त्यांनी म्हटले. भारताची दरडोई वाढ चीनच्या तुलनेत केवळ एक चतुर्थांश आहे. आणि योग्य धोरणामुळे विकास दर ७ टक्क्यांच्या वर असू शकतो. यामुळे आगामी काळात भारत एक मजबूत आर्थिक शक्ती म्हणून उदयास येईल.
रुपयाची ताकद वाढणार
रुबिनी यांनी म्हटले की जागतिक पातळीवर भारतीय रुपया कालांतराने प्रमुख चलनांपैकी एक बनू शकेल. म्हणजे येत्या काही काळात जगभरात भारतीय रुपया खणखणार. रूबिनी यांनी यासह सांगितले की, एकूणच कालांतराने डी-डॉलरायझेशनची प्रक्रिया होईल. त्यांनी पुढे म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेत अमेरिकेचा वाटा ४० ते २० टक्क्यांपर्यंत घसरत आहे.