police seized 12 swords, राजस्थानमधून महाराष्ट्रात आणण्यात येत होता मोठा शस्त्र साठा, पाहा कारमध्ये काय काय सापडलं – police seized 12 swords and arrest 10 accused in shirpur dhule
धुळे : इंदोर येथून विविध हत्यारे घेवून धुळ्याकडे निघालेल्या एका टोळीला शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड चेकपोस्टजवळ ताब्यात घेतले आहे. टोळीकडून मोठा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली धारदार शस्त्रे राजस्थानमधून महाराष्ट्रात आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांना या बाबत गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड या सीमा तपासणी नाका येथे पांढऱ्या रंगारी कार रोखली. या कारमधून धारदार शस्त्रांची वाहतूक करण्यात येत होती. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १२ तलवारींसह दोन गुप्ती, एक चॉपर, एक बटनाचा चाकू, दोन फायटर इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. आणि पोलिसांनी केलेल्या ह्या कारवाईत एक असा सुमारे ६ लाख २९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शिरपूर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सतपाल गिरधर सोनवणे, किरण नंदलाल दुधेकर, विकास देवा ठाकरे, सखाराम रामा पवार, सचिन राजेंद्र सोनवणे, राजू अशोक पवार, विशाल विजय ठाकरे, संतोष नामदेव पाटील, अमोल शांताराम चव्हाण, विठ्ठल सोनवणे हे सर्व राहणार धुळे तालुक्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिरपूर पोलिसांनी केलेल्या या दमदार कामगिरीमुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी १० हजार रुपयांचे रोख बक्षीसही शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना आणि त्यांच्या पथकाला दिले आहे.