काय आहे झोंम्बी ड्रग्ज (Xylazine)
अमेरिकेमध्ये जायलाजाईन नावाच्या औषधाचा वापर वाढत आहेत. खरंतर, या औषधाचा वापर हा जनावरांसाठी केला जातो. ज्याचा वापर जनावरांना बेशुद्ध करण्यासाठी केला जातो. पण अमेरिकेमध्ये अनेक शहरांमध्ये तरुण वर्ग या औषधाचे ड्रग्जच्या म्हणून सेवन करत आहेत. या ड्रग्ज सेवन केलेला रुग्ण थेट झोंम्बी होत आहे. अमेरिकेच्या रस्त्यांवर अशा झोंम्बी बनून फिरणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. संपूर्ण जगासाठी ही मोठी गंभीर बातमी आहे.
या ड्रग्जचा काय परिणाम होतो….
या ड्रग्जचे सेवन केल्यानंतर बेशुद्ध होणं, सारखी झोप लागणं आणि श्वास अपुरा पडणं अशा समस्या उद्भवतात. इतकंच नाहीतर अनेक लोक झोंम्बीसारखे वागत आहेत. अशा लोकांचे व्हिडिओ आणि फोटोही सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. नागरिकांनी वारंवार या ड्रग्जचे सेवन केल्यामुळे थेट मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत.
खरंतर, या ड्रग्जच्या सेवनाचे मोठे दुष्परिणाम आहेत. यामुळे संपूर्ण शरीरावर जखमा होऊ लागतात, शरीर सडू लागतं आणि यामुळे थेट मृत्यूही होतो. मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग यामध्ये अडकला आहे. यामुळे ही अमेरिकेसाठी धोक्याची घंटा आहे.