पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आज शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यासाठी भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शो केला. मात्र या रोड शो मध्ये मुख्यमंत्र्यांना एका कट्टर शिवसैनिकाच्या रोषाला सामोरे जावे लागले.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचा हा रोड शो सुरू असताना मुख्यमंत्री हात उंचावून नागरिकांना अभिवादन करत होते. मात्र याच वेळेला ‘आले रे आले गद्दार आले’च्या घोषणा सुरू झाल्या. त्यामुळे या रोड शो मध्ये एकच गोंधळ उडाल्याचे चित्र होतं. दरम्यान, या घोषणा देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतल असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, ही व्यक्ती कोण आहे याबाबत अधिक तपशील कळू शकला नाही.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने हे रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे रिंगणात आहेत. रवींद्र धंगेकर रिंगणात असल्याने हेमंत रासने यांच्या समोर कडवं आव्हान आहे. त्यामुळे भाजपने आपल्या बड्या नेत्याची फौज कसबा पेठ मध्ये उतरवली होती. त्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेमंत रासने यांच्या प्रचाराला आले होते.

या वयातही तुम्ही ४० मिनिटे उभे होतात, MPSC परीक्षार्थींकडून कौतुक, पवार म्हणाले, माझी एक तक्रार, तुम्ही…
मात्र यावेळी एकनाथ शिंदे यांना रोशाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे कसब्यात सुरुवातीला पक्षांतर्गत नाराजी, त्यानंतर ब्राह्मण समाजाची नाराजी आणि आता मुख्यमंत्र्यांच्या रोड शो मध्येच झालेल्या ‘गद्दार गद्दार’ची घोषणाबाजी हेमंत रासने यांची डोकेदुखी वाढवेल असं दिसतंय.

दरम्यान काही दिवसांपूर्वी नवी पेठ येथे शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांसमोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर काल आदित्य ठाकरे यांचे देखील भाजपच्या कार्यालय समोर येताच जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीमध्येच गद्दार गद्दार च्या घोषणा दिल्याने पुण्यात वातावरण तापण्याचे चिन्ह आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here