नवी दिल्ली: ३० रुपये दिले नाहीत म्हणून दोन भावांनी मिळून चार लेकरांच्या बापाला संपवलं आहे. अवघ्या ३० रुपयांसाठी या दोघांनी ४ पोरांना पोरकं केलं आहे. छोट्याशा कारणावरुन यो दोन भावांनी एका व्यक्तीचा जीव घेतला आहे. राजधानी दिल्लीतील मॉडेल टाऊन परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या ३० रुपयांच्या व्यवहारातून एका तरुणाला मारहाण आणि मग त्याच्यावर चाकूने वार करुन त्याची हत्या करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या ३० रुपयांच्या वादातून दोन भावांनी या व्यक्तीचा भोसकून खून केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी बाबू जगजीवन राम रुग्णालयात पाठवला. तर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपी भाऊ राहुल आणि हरीश यांना अटक केली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली शस्त्रंही जप्त केली आहेत.

कोळशाच्या डंपरमध्ये फसला, बाईक २०० मी फटपटत गेली, डंपरला आग, अपघातात तरुणाचा करुण अंत
मॉडेल टाऊन पोलीस स्टेशनला संध्याकाळी एका व्यक्तीवर चाकूने वार झाल्याचा पीसीआर कॉल आला. माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहोचले असता एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडून होता. त्याच्या पोटात चाकूने वार करण्यात आले होते. पोलिसांनी त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल केला, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनू असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जो गुड मंडी मॉडेल टाऊनमध्ये राहत होता. सोनू विवाहित असून त्याला चार मुले आहेत. सोनू लग्न समारंभात केटरिंगचे काम करायचा. सोनूसोबत राहुलही काम करायचा. चौकशीत ही घटना केवळ ३० रुपयांसाठी झाल्याचे निष्पन्न झाले.

पतीसोबतचा फोटो सोशल मीडियावर टाकला, प्रियकराचं डोकं फिरलं… तिच्या घरी गेला अन्…
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार सोनू आणि आरोपींमध्ये गेल्या काही दिवसांपासून ३० रुपयांवरून वाद सुरू होता. काल संध्याकाळी राहुल हा त्याचा भाऊ हरीशला सोबत घेऊन सोनूकडून पैसे घेण्यासाठी आला होता. सोनूला धडा शिकवण्यासाठी सोबत चाकूही घेऊन आला होता.

मग त्यांच्यात पैशांवरून वाद झाला. यानंतर हाणामारी सुरू झाली. यावेळी दोन्ही भावांनी सोनूला बेदम मारहाण केली. त्यानंतर सोनूच्या पोटात चाकूने अनेक वार केले आणि सोनू रक्ताच्या थारोळ्यात थेट जमिनीवर पडला. याप्रकरणी पोलिसांनी राहुल आणि हरीश या दोन्ही आरोपी भावांना अटक केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here