नाशिक: नाशिकच्या त्रंबकेश्वर तालुक्यात खाजगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. गुजरातचे भाविक त्र्यंबकेश्वर येथून दर्शन घेऊन परत जात असताना या बसला अपघात झाला आहे. या अपघातात सुमारे ३० भाविक जखमी असून त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गुजरात येथील कच्छ येथील ५७ भाविक त्र्यंबकेश्वर येथील दर्शन घेऊन गुजरातला परत जात असताना हा अपघात झाला. गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येते असून इतर प्रवाशांना हरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, गुजरात मधील ५७ भाविक एका खाजगी बसने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते. यावेळी दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असताना गुजरातला जोडल्या जाणाऱ्या खरपडी घाटात बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या बस मध्ये ५७ प्रवासी होते तर त्यापैकी जवळपास ३० भाविक जखमी आहे. जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी करिता दाखल करण्यात आले आहे.

नियतीचा निर्दयीपणा! जन्मदाते रुग्णालयात, गावकऱ्यांकडून पाच वर्षांच्या अन्वितला अखेरचा निरोप
त्र्यंबकेश्वर गुजरात मार्गावर असणाऱ्या हरसुल जवळील खरपडी घाटात ही गुजरातच्या भाविकांची बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली असून बसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. दरम्यान बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची देखील माहिती काही जखमींकडून मिळाली आहे. अपघात स्थळावर काही स्थानिक नागरिकांकडून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

आई पाठोपाठ बाबाही गेले, दोन दिवसांत चार पोरं अनाथ, औरंगाबादेत हळहळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here