sunil gavaskar on team india, सुनिल गावस्करांनी रोहित शर्मा आणि संघाकडे व्यक्त केली इच्छा; माझ्यासाठी तुम्ही फक्त… – team india to win wtc odi world cup 2023 sunil gavaskar expressed desire
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चार सामन्यांच्या बॉर्डर -गावस्कर ट्रॉफीत भारताने पहिल्या दोन कसोटी ६ दिवसात जिंकल्या. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा पोहोचण्यास सज्ज झाली आहे. WTCची फायनल या वर्षी जून महिन्यात इंग्लंडमधील ओव्हर मैदानावर होणार आहे. टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचण्याआधीच माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी रोहित शर्मा आणि कंपनीकडे एक खास इच्छा व्यक्त केली आहे.
टीम इंडिया या वर्षी २०२३ मध्ये आयसीसी वनडे वर्ल्डकप आणि आशिया कप स्पर्धा खेळणार आहे. दुसरीकडे भारताने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जवळ जवळ प्रवेश केलाय. अशात दिग्गच क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाकडे एक इच्छा व्यक्त केली आहे. गावस्करांची अशी इच्छा आहे की, भारताने या वर्षी WTC आणि वनडे वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवावे. याच बरोबर जर टीम इंडियाने आशिया कप जिंकला तर तो सुवर्ण क्षण ठरेल. उगाच नाही पॅट कमिन्स संघाला सोडून मायदेशी परतला; कारण वाचल्यानंतर कराल कौतुक आणि प्रार्थना गावस्कर म्हणाले, “जेव्हा तुम्ही एक चॅम्पियनला पाहता तेव्हा स्वत:ला तसे होण्याचे स्वप्न पाहता. जेव्हा तुमचे खेळाडू खेळ सुधारत असतात तेव्हा सर्व काही योग्य दिशेने पुढे जात असते. मला भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप जिंकलेला पाहायचे आहे. या दोघांच्या मध्ये आशिया कप देखील होणार आहे. जर त्याचे विजेतेपद देखील मिळवले तर त्याच्यापेक्षा सुंदर काही होऊ शकत नाही”.
कसोटी क्रिकेटमधील अफलातून कॅचनंतर टिम साऊदीने इतिहास घडवला; पहिलाच गोलंदाज ज्याने… भारतीय क्रिकेट संघाने गेल्या १० वर्षात एकदाही आयसीसीच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले नाही. २०१९ साली वनडे वर्ल्डकपमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून सेमीफायनलमध्ये पराभव झाला होता. तर २०२१च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडनेच भारताचा पराभव केला होता. भारतीय क्रिकेट संघाने २०११ साली महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली वनडे वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर भारताला आयसीसीचे विजेतेपद मिळवता आले नाही.