शेगाव, बुलडाणा : मावस भावाच्या बायकोवर डोळा ठेवणारा विकृत दिर आता चांगलाच अडकला आहे. मावस भावाच्या बायकोला, म्हणजे वहिनीला गोड गोड बोलून पटवण्याचा प्रयत्न तो करत होता. एक दिवस मावस भाऊ घरी नसताना तो स्वयंपाक घरात घुसला अन् वहिनीसोबत नको ते केलं. शेगावच्या मंगलम नगरात २० फेब्रुवारीलाही घटना घडली आहे.

पोलीस सूत्रांनी या प्रकरणी माहिती दिली आहे. आरोपी मावस दिराचा त्याच्या वहिनीवर डोळा होता. तो वहिनीला नेहमी ‘तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात, तुमच्यासारखी बायको भेटायला नशीब लागते’ असे म्हणायचा. अनेकदा तिच्या सौंदर्याची स्तुती करायचा. दिर असल्याने विवाहिता त्याकडे गंमत म्हणून दुर्लक्ष करायची. पण दिर हा सातत्याने वहिनीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता.

ऐन घाटात ST बसचे ब्रेक फेल, ४० प्रवासी बसलेले, एका बाजूला खोल दरी, चालक ठरला देवदूत…
दरम्यान, २० फेब्रुवारीच्या दिवशी दिर विवाहितेच्या घरी आला. ‘वहिनी दादा कुठे आहेत?’ असे त्याने विचारले. त्यावेळी ते कामावर गेलेत, असे सांगून विवाहिता चहा करण्यासाठी किचनमध्ये गेली. घरी कुणीच नसल्याची संधी साधून दिर स्वयंपाक घरात घुसला अन् विहिनीला पाठीमागून पकडलं. चुकीच्या ठिकाणी स्पर्श करीत लगट करण्याचा प्रयत्न केला. यामुळे महिला संतापली. याबाबत विवाहितेने शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून मावस दिराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

विवाहित महिलेने उपचारादरम्यान प्राण सोडले; मृत्यूचं कारण समोर आल्यानंतर सर्वजणच झाले सुन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here